महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटना शाखा बिलोलीच्या वतीने विविध मागण्यासाठी अमरण उपोषण

198

 

बिलोली प्रतिनीधी- रवी कांबळे

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना शाखा बिलोली च्या वतीने पंचायत समिती कायर्यालयासमोर आपल्या मागण्यासाठी अमरण उपोषणानांचा मार्ग अवलंबला आहे.
याअगोदर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून दि.4-02-2019 ते 28-01-2022 पर्यंत अनेक वेळा निवेदन सूध्दा संबधीत अधीकाऱ्यांनी या निवेदनाकडे जाणीव पूर्वक टाळाटाळ करीत आहे.त्यामूळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून नाईलाजास्तव अमरण उपोषणाचा मार्ग अंवलंबला आहे.
यावेळेस संघटनेचे अध्यक्ष-अप्पाराव रावण शिंदे,उपाध्यक्ष-हणमंत संभाजी वाघमारे,सहसचिव,-खंडू जेठे,लक्ष्मण होरके,अलीम मैनोद्दीन,पठाण जाफरखाँ,देवराव नरवाडे,चंद्रकांत अंबेकर,यांनी अमरण उपोषाणास बसले आहेत.

- Advertisement -

सदर उपोषणास तालूक्यातील 73 ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थीत होते.सदरील मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा संघटनेच्या वतीने घेण्यात  आला आहे असे अध्यक्ष यांनी सांगीतले

मागण्या :-
1)शासनाकडून सन 2007 पासून आजपर्यत राहणीमान भत्ता मिळणे.
2) शासनाकडून कर्मचारी पगाराचा 8.33 प्रमाणे ग्रामपंचायतने अद्याप भरणा केलेला नाही.

सदरील निवेदनाची प्रत स्पीड पोस्टा मार्फत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.पं नादेड याच्याकडे पाठविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.