नायगाव येथे बँक ऑफ इंडियाची दि. 5 फेब्रुवारी रोजी महालोक अदालत, थकबाकीदार कर्जदारांनी लाभ घ्यावा

शाखाधिकारी यांचं आवाहन

334

 

नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

बँक ऑफ इंडिया शाखा नायगांव,च्या वतीने  दि. 05/02/2022 रोज शनिवार या दिवशी महालोक अदालत चे आयोजन नायगाव शाखा येथे  करण्यात आले आहे.जास्तीत जास्त थकबाकीदार कर्जदार,शेतकरी यांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

    या शाखाअदालत मध्ये जे कर्जदार थक बाकीदार असतिल त्यांना तडजोडीमार्गे तोडगा काढून कर्जमुक्त करण्यात येईल. या शाखा अदालत मध्ये आमचे अधिकारी योग्य मार्गदर्शन करतील जेणेकरूण जास्तीत जास्त थकबाकीदार कर्जमुक्त होतील.या साठी या आदा लंतीचे  आयोजन करण्यात आले आहे.

   हि अदालत दि. 05/02/2022 रोज शनिवार सकाळी 10:00वाजेपासुन असेल.

तरी नायगाव तालुक्यातील सर्व थकबाकीदार याना या बाबत  जाहीर आव्हाहन करण्यात आले आहे की या संधीचा लाभ घेत आपण त्वरित बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव च्या  शाखाधिकारी नरसिम्हाचारि फील्ड ऑफिसर वम्शीनाथ गौड़, यांना भेटून आपले प्रकरण निकाली काढून घ्यावेत असे शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.