इग्रमस्वराज प्रणाली व PFMS प्रणालीद्वारे होणार्या 15 वा. वित्त आयोगाच्या, प्रक्रिये बाबत प्रशिक्षण शिबीर संपन्न
नांदेड प्रतिनिधी – आनंद गोडबोले
दिनाक ०७/१२/२०२१ रोजी जिल्हा परिषद नादेड येथे तालुका स्तरावरील अधिकारी गट विकास अधिकारी, सहा. लेखाधिकारी, तालुका व्यवस्थापक, तालुका संगणक परिचालक यांचे एकदिवशीय इग्रमस्वराज प्रणाली व PFMS प्रणालीद्वारे होणार्या 15 वा. वित्त आयोग आयोगाच्या. प्रक्रिये बाबत प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले आहे.
या प्रशिक्षणास मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, श्री नामदेव केंद्रे, सहा. वित्त लेखाधिकारी श्री शेखर कुलकर्णी, लेखाधिकारी श्री देशमुख, अशोक पवाडे या मान्यवराच्या उपस्थितीत जिल्हा व्यवस्थापक तथा प्रशिक्षक शुधोधन लोने , सहा. जिल्हा व्यवस्थापक राजीव वानखेडे यांची उपस्थिती होती..
सविस्तर वृत्त असे कि यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे इग्रमस्वराज व PFMS द्वारे 15 वित्त आयोगाचा निधी ऑनलाईन खर्च करण्याची प्रक्रिया.,व त्या साठी आवश्यक माहिती. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिनाक ०७/१२/२०२१ रोजी सकाळी 11.०० वाजता सुरु झाले. त्यानंतर प्रशिक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक शुधोधन लोने यांनी पावर पोईट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून ऑनलाईन प्रतीक्षक करून दाखवून या मध्ये येणाऱ्या विविध समस्या कशा सोडवाव्यात या संबंधीची इथांभूत माहिती सर्व तालुका सतरावरील सबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दिली.