शरदचंद्र महाविद्यालयातील दुग्धशास्त्र विभागामध्ये वर्गीस कुरियन यांची जयंती साजरी.

206

 

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
येथील शरदचंद्र महाविद्यालयातील दुग्धशास्त्र विभागामध्ये राष्ट्रीय मिल्क दिवसाच्या निमिताने धवल क्रांतीचे जनक आणि अमूल दुध कंपणीचे सह निर्माते वर्गीस कुरियन यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. शंकर गड्डमवार होते तर प्रमूख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. श्याम पाटील, प्रा.डॉ नामदेव सानप, प्रा.डॉ. शुकतला शिंदे होते. दुग्धशास्त्र विषय प्रमूख प्रा.डॉ. संजीवनी वाडेकर व डॉ. इरफान सिद्यीकी यांनी धवल क्रांती व वर्गीस कुरियन यांचे धवल क्रांतीतील योगदान याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यानी देशी गायी,जर्सी गायी, नील गाय,गीर गाय यामध्ये कोणता फरक आहे? त्यांच्या दुधामध्ये फरक असतो का? असे अनेक प्रश्र विचारुन आपल्या वेगवेगळ्या शंकचे निरसन करुन घेतले. अध्यक्षीय समारोप करतांना प्रा.डॉ. शंकर गड्डमवार यांनी म्हणाले की, दुध हे पुर्ण अन्न आहे कारण त्यामध्ये व्यक्तीच्या शारिरीक व बौद्धिक विकासासाठी लागणारे सर्वच घटक आहेत त्यामुळे प्रत्येकांनी दुधाचे योग्य प्रमाणामध्ये प्राशन करणे गरजेचे आहे. धवल क्रांती अधिक विकसित होण्यासाठी कृषीचा विकास होण्याची आवश्यकता आहे तर कृषीचा विकास होण्यासाठी शेतीला बारमाही पाण्याची व्यवस्था करण्याचे कार्य सरकारला करावे लागते पण स्वातंत्र्याची अमृत महोत्सव साजरा करीत आहोत पण जलसिंचनाचे कार्य केवळ 20% पूर्ण झाले आहे हे कृषीप्रधान म्हणून किर्ती असणाऱ्या भारत देशामध्ये खूप निराशा करणारी आहे म्हणूनच कृषीवर आधारलेला शेतकरी सातत्याने नापिकीमुळे आत्महत्या करीत आहेत. दुध हे अतिशय मौल्यवान घटक आहे.गोडतेल देखील अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे जनतेनी त्याचा वापर आपल्या आरोग्यासाठी करावा. देवावर श्रध्दा म्हणून फुले वाहावीत पण दुग्धाभिषेक अथवा तेलाभिषेक म्हणून दुध व तेल देवाच्या मुर्तीवर वाहुन नासाडी करू नये असे आवाहनही डॉ. शंकर गड्डमवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार विभागप्रमूख डॉ. संजीवनी वाडेकर यांनी केले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.