वंचित बहुजन आघाडी तर्फे आयोजित मुस्लिम समाजाच्या मागण्यासाठी औरंगाबाद येथे धरणे.

251

 

औरंगाबाद /प्रतिनिधी

आदरणीय_बाळासाहेब_आंबेडकर यांच्या नेतृत्वात तथा मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या वंचित बहुजन आघाडी तर्फे आयोजित मुस्लिम समाजाच्या
5% शैक्षणिक आरक्षण तत्काळ लागू करणे.
पैगंबर महोम्मद बिल मंजूर करणे.
संत विचारांचे प्रचारक ह.भ.प किर्तनकार यांना सरकारी मासिक वेतन तत्काळ चालू करणे
अश्या विविध मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ते फारुख अहेमद ,वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकले,औरंगाबाद शहर अध्यक्ष पुर्व जमिल देशमुख, औरंगाबाद पश्चिम शहर अध्यक्ष संदिप भाऊ शिरसाठ,औरंगाबाद महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष लताताई बामणे,औरंगाबाद महीला आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदनाताई नरवडे, यांच्या प्रमुख उपस्थित आंदोलन करण्यात आले.

यावेळी अफसर पठाण, शाम भारसाखळे (मामा) , एस . पी. मगरे, मिलिंद बोर्डे, रवी राठोड, नितिन भुईगळ, शुभम साळवे, प्रदिप इंगळे, अनिल अण्णा जाधव, माधवराव काळे तात्या, प्रदिप बनसोडे, देवा त्रिभुवन, किशोर निकाळजे, पौर्णिमा हिवराळे,तसेच महीला आघाडी च्या लता झोंबाडे, साधना पठारे, छाया मेश्राम, उज्वला मानकर, वैशाली राणेकर, जया गजभिये, देंडगे ताई, श्रुती शिरसाठ, कोमल. एस. हिवाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मुस्लिम बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…

Leave A Reply

Your email address will not be published.