कृष्णूरच्या किर्ती गोल्ड कंपनीचा प्रताप……..खरेदी करते अवैधरित्या तोडलेली लाकडे.
कृष्णूरच्या किर्ती गोल्ड कंपनीनचा प्रताप……..खरेदी करते अवैधरित्या तोडलेली लाकडे
नायगांव / प्रतिनिधी। ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यासह ग्रामीण भागात वृक्षांची मोठ्या प्रमाण तोड होत असल्यामुळे नायगांव तालुक्यातील कुष्णूर औद्योगिक वसाहतीत कार्यान्वित असलेली किर्ती गोल्ड कंपनी ही गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या व वनपरीक्षेत्र अधिकाऱ्याच्या डोळ्यात धूळ टाकून मोठ्या प्रमाणात लाकूड खरेदी करत असल्यामुळे ग्रामीण भागातील अतिशय मौल्यवान वृक्षांची तोड होत असल्याचे दिसून येत आहे .
असे असतांना ही उपवनसंरक्षण वन विभाग नांदेड यांनी लक्ष देत नसल्याने किर्ती गोल्ड कंपनीने लाकूड खरेदी करत आहे.
तालुक्यातील किर्ती गोल्ड कंपनीने लाकूड खरेदी करत असल्यामुळे ग्रामीण भागात वाळवंटाचे स्वरूप आल्याचे दिसून येत असून वृक्ष तोडीसाठी टोळ्या सक्रिय झाल्या असल्याने वनपरिक्षेत्राधिकारी बिलोली देगलूरच्या अधिकाऱ्यांनी कंपनीने ची तात्काळ चौकशी करून त्या कंपनीवर कारवाई करावी असी मागणी ग्रामीण भागातील जनतेनी केली असून सदरची वृक्ष तोड मोठया प्रमाणात होत असून कृष्णुरची एमआयडीसी ही राज्यासह जिल्ह्यात प्रसिद्ध असल्यामुळे राज्यात उद्योग सुद्धा जोरदार चालतो किर्ती गोल्ड कंपनीने लाकूड खरेदी करत असल्यामुळे नायगांव तालुक्यातील वृक्षांची चांगलीच विल्हेवाट लागली असल्यामुळे वनविभाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी जनतेची मागणी पुढे येत आहे .
कुष्णुर किर्ती गोल्ड कंपनीने मोठया प्रमाणात लाकूड खरेदी करत असतांना सुद्धा नांदेडचे उपवनसंरक्षक अधिकाऱ्याने किर्ती गोल्ड कंपनीकडे जाणून बुजून लक्ष देत नाही, लाकडाची खरेदी करून ग्रामीण भागात कंपनीने वृक्षांची चांगलीच वाट लावली असल्यामुळे सदरच्या अधिकाऱ्यांनी किर्ती गोल्ड कंपनीतील स्ट्राॅक लाकडांची चौकशी करून पंचनामा करावा सदरच्या कंपनीवर कारवाई करावी असी वनप्रेमी नागरिकासह जनतेनी मागणी केली असून खरे तर किर्ती गोल्ड कंपनीने प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून लाकूड खरेदी करत असल्याने ग्रामीण भागातील वृक्षांची चांगलीच विल्हेवाट लागली असल्यामुळे कंपनीवर कारवाई करण्यात यावी असी मागणी जोर धरीत आहे
ब्एखाद्या भांडवलदारांची कंपनी वेगाने चालावी म्हणून वेगवेगळ्या वृक्षांची कत्तल होऊन संपूर्ण नायगांव मतदारसंघ वाळवंट झाले तर भविष्यात फार मोठ्या गंभीर प्रश्नाला तोंड द्यावे लागेल, तेव्हा वरिष्ठांनी वेळीच आपल्या अधिकाराप्रमाणे निर्णय घेऊन वृक्षांची कत्तल तोड थांबवावी व सदर कंपनीवर कारवाई करावी. अशी मागणी अनुभवी नागरिक करीत असल्याचे दिसून येते.