कोटितीर्थ पंपगृहातील कामाची महापौर जयश्री पावडे यांनी केली पाहणी.

महापौर , स्थायी समिती सभापती, आणि आयुक्तांनी घेतला संयुक्त आढावा

251

 

नांदेड/प्रतिनिधी – आनंद गोडबोले

नांदेड शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मुख्य स्त्रोत असलेल्या कोटितीर्थ पंपगृहाच्या कामाच्या प्रगतीची पाहणी आज महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांनी केली. यावेळी कामाच्या प्रगतीचा त्यांनी आढावा स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, आयुक्त डॉ. सुनील लहाने, यांनी संयुक्तपणे घेतला.

यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, अभियंता संघरत्न सोनसळे, सतिश ढवळे, उपअभियंता गोकुळे, कनिष्ठ बोडके आदींची उपस्थिती होती.

              नांदेड शहरास पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या कोटितीर्थ पंपगृह सन 1997 साली उभारण्यात आला होता. तद्नंतर नांदेड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता या पंपगृहात सन 2008 साली नवीन सहा पंप बसविण्यात आले. सन 2008 ते 2021 या कालावधीत पंपाचे आर्युमान संपल्यामुळे पाणी उपसाची क्षमता कमी झाल्यामुळे पाण्याचा तुटवडा होत होता. शिवाय सदरील पंप वारंवार नादुरूस्त होत असल्याने येथे नवीन पंप बसविणे आवश्यक होते. ही बाब विचारात घेऊन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंधराव्या वित्त आयोगातून नवीन 335 अश्‍वशक्तीचे पंप घेण्याचा निर्णय घेतला.

या पंपामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देेयकात आकारण्यात येणार्‍या पॉवर फॅक्टरचा दंड कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा पैसा बचत होईल. शिवाय सर्व जलशुद्धीकरण केंद्र, पंपगृह, मल शुद्धीकरण केंद्र आणि मलउपसा केंद्रावर ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कामे प्रगती पथावर असून या कामानंतर नांदेडकरांना मुबलक पाणीपुरवठा होईल असा विश्‍वास महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.