spot_img
spot_img
spot_img
spot_img

राजसेतू कन्स्ट्रक्शनच्या गचाळ कारभारामुळे नायगावकर त्रस्त.

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क –

नायगाव शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये राजसेतू कन्स्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक रस्ते खोदून कामे सुरू करण्यात आली असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे “काम चालू आहे” असे सूचना फलक किंवा बॅनर अनेक ठिकाणी लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

रस्त्यांवर मोठे खड्डे, उघडी गटारे तसेच बांधकाम साहित्य विखुरलेल्या अवस्थेत असल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशव्यवस्था किंवा इशारा फलक नसल्याने दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागत असून किरकोळ अपघातांच्या घटनाही घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिली

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन सुरक्षा फलक लावावेत, कामे वेळेत पूर्ण करावीत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी नायगावकरांकडून होत आहे.

Related Articles

नायगाव दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; रजिस्ट्रीच्या नावाखाली सामान्यांची लूट?…

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क - नायगाव दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात कथित दलालांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा असून, दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांकडून रजिस्ट्रीच्या नावाखाली अतिरिक्त पैसे...

कर्तव्यनिष्ठ पोलीस उपनिरीक्षक विश्वाभर निकम यांचा सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती सोहळा

  नायगाव / प्रतिनिधी - माधव धडेकर  कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि जनसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे पोलीस उपनिरीक्षक विश्वाभर दिगंबरराव निकम यांनी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!