spot_img
spot_img
spot_img
spot_img

रूई (बु.)येथील अवैध दारु विक्री संदर्भात… महिलांचा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनात एल्गार…

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क –


नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे रुई (बु.) येथे अवैधरित्या सुरू असलेल्या देशी दारू विक्रीने गावातील सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, घराघरातील संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप गावातील महिलांनी केला आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त महिला बचत गटाच्या सदस्यांनी थेट नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात धाव घेत अवैध देशी दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दारूसाठी पैसे न दिल्यास घरातील भांडीकुंडी विकण्यापर्यंत मजल जात असून अनेक महिलांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी कुंटूर पोलिस ठाण्यात तक्रारी देऊनही अवैध धंदे सुरूच असल्याने महिलांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

निवेदनात काही व्यक्तींची नावे नमूद करून गावात मोठ्या प्रमाणात देशी दारू आणून विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “आम्ही पोलिसांना हप्ते देतो, आमचे काहीही वाकडे होणार नाही,” अशा प्रकारच्या धमक्या देत महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे संबंधितांवर कठोर कारवाई करून हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा, अन्यथा महिला बचत गटातील सर्व महिला उपोषण करणार, तीव्र आंदोलन छेडतील, रेखाताई अनिल कांबळे ग्रामसखी कुंटूर यांनी असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग व तहसीलदार यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले असून, आता प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सदर निवेदनावर लक्ष्मीबाई पवार, रेजाबाई वाघमारे, अर्चना पवार,रुई सरपंच प्रियांका निलेश देशमुख, रेखाताई अनिल कांबळे, रमा वाघमारे, भारतबाई पवार,मतुराबाई पवार,निरमाला पवार,सरुबाई पवार,रत्नमाला लांडगे, वंदना वाघमारे,आशा कांबळे,शिल्पा पवार,सुलनबाई पवार,लक्ष्मीबाई गायकवाड,शेताबाई पवार,वर्षा पवार,रमाबाई सोनकांबळे,सविता सोनकांबळ, सोनकांबळे कौलीकाबाई,कविता वाघमारे,अनुसयाबाई सोनकांबळे ,ज्योती वाघमारे,निलेश देशमुख अनिल कांबळे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

नायगावातील ९ लाख ७० हजार रुपयांच्या चोरीचा उलगडा; कुटुंबातील मुलगाच निघाला मास्टरमाईंड.

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क - नायगाव पंचायत समितीतील कर्मचारी कोटकर यांच्या व्यंकटेश नगर येथील भाड्याच्या घरातून चोरीस गेलेल्या सुमारे ९ लाख ७० हजार रुपयांच्या रकमेचा...

नायगाव वाहतूक पोलिसांचा अजब कारनामा..’चोर सोडून संन्याशाला फाशी’ रस्त्याच्या कडेला गाडी लावलेल्या पत्रकाराला बेकायदेशररित्या आकारला दंड. 

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क - नायगाव दि. 30 येथील हेडगेवार चौकात वाहतूक पोलिस हे अपवादानेच आढळून येतात परंतु आज पत्रकार प्रकाश महीपाळे हे अत्यंत आवश्यक...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!