नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क –
नायगाव दि. 30 येथील हेडगेवार चौकात वाहतूक पोलिस हे अपवादानेच आढळून येतात परंतु आज पत्रकार प्रकाश महीपाळे हे अत्यंत आवश्यक अशा फोन कॉल वर रस्त्याच्या बाजूला गाडीवर बसून बोलत असताना नायगाव पोलीस स्टेशन चे वाहतूक नियत्रन करणारे पोलिस कर्मचारी श्री शेरीकर यांनी कुठलीही शहनिशा न करता रस्त्याच्या बाजूला गाडीवर बसून बोलत असलेल्या पत्रकार प्रकाश महीपाले यांच्या मोटासायकल क्रमांक MH26BK9797 या गाडीवर मोटार वाहन कायदा कलम 122व 177 अंतर्गत पाचशे रुपयाचा ऑनलाईन दंड आकारला परंतु वरील कलमांच्या आधारे जर एखादा वाहन चालक आपली गाडी रस्त्याच्या मधोमध किंवा वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी जर सोडली असेल तरच त्यांच्यावर दंड आकारण्यात येतो परंतु सदरील पत्रकार हे गाडीवर बसूनच होते त्यामुळे शेरीकर यांनी कोणत्या आकसापोटी त्यांच्यावर ऑनलाईन दंड आकारला हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे…
त्यादरम्यान हेडगेवार चौकात भरपूर वाहने उभी होती परंतु शेरीकर यांनी त्यांना कसल्याही प्रकारचा दंड आकारला नाही त्याच वेळेस एका रिक्षा चालकांना दमदाटी करून पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले परंतु त्याच्यावर कोणती कारवाई केली हे अद्याप गुलदस्त्यात आहे…

वास्तविक पाहता हेडगेवार चौकात वाहतूक नियंत्रणासाठी वरदळीच्या वेळेस सकाळी 8 ते 11 च्या दरम्यान एकही वाहतूक नियंत्रण कर्मचारी उपस्थित राहत नाही परिणामी शालेय विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना वाहतुकीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे…
आजचा नायगाव येथील वाहतूक कर्मचारी यांचा प्रताप म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे असाच सिद्ध होतो. वाहतूक कोंडीची व या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून नायगावचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक भागत साहेब कोणती कारवाई करतील याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे







Total Users : 200063