spot_img
spot_img
spot_img
spot_img

नायगावातील ९ लाख ७० हजार रुपयांच्या चोरीचा उलगडा; कुटुंबातील मुलगाच निघाला मास्टरमाईंड.

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क –

नायगाव पंचायत समितीतील कर्मचारी कोटकर यांच्या व्यंकटेश नगर येथील भाड्याच्या घरातून चोरीस गेलेल्या सुमारे ९ लाख ७० हजार रुपयांच्या रकमेचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) यशस्वीपणे उलगडा केला आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, चोरीचा सूत्रधार हा संबंधित कर्मचाऱ्यांचा स्वतःचाच मुलगा असल्याचे तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समितीतील कर्मचारी कोटकर यांनी प्लॉट खरेदीसाठी मोठ्या कष्टाने ९ लाख ७० हजार रुपयांची रक्कम घरात ठेवली होती. ही रक्कम अचानक गायब झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना घरातील व्यक्तींवर संशय आला. चौकशीदरम्यान संबंधित मुलाने सुरुवातीला दिशाभूल करणारी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सातत्याने आणि बारकाईने केलेल्या चौकशीनंतर त्याचा बनाव उघडकीस आला. अखेर त्याने आपल्या अल्पवयीन मैत्रिणीच्या मदतीने पूर्वनियोजित पद्धतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपीकडून ९ लाख ३६ हजार रुपये जप्त केले असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे नायगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कुटुंबातील सदस्यानेच विश्वासघात केल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्वतःच्या मुलासाठी प्लॉट घेण्यासाठी जमा केलेली रक्कम स्वतःचाच मुलगा चोरतो तेव्हा एका वडिलांना किती त्रास होतो याचे ज्वलंत उदाहरण नायगाव येथे पाहण्यास मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास लवकर लागल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Related Articles

कर्तव्यनिष्ठ पोलीस उपनिरीक्षक विश्वाभर निकम यांचा सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती सोहळा

  नायगाव / प्रतिनिधी - माधव धडेकर  कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि जनसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे पोलीस उपनिरीक्षक विश्वाभर दिगंबरराव निकम यांनी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र...

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून जि.प. शिक्षकाची मुलासह नदीत उडी घेऊन आत्महत्या.

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क - नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथील रहिवासी असलेले शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह, सारा (१२) आणि...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!