spot_img
spot_img
spot_img
spot_img

कुंटूर पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने बळेगाव परिसरात अवैध दारू विक्री जोमात.

 

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क –

कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बळेगाव व परिसरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप स्थानिक युवकांनी केला आहे. या प्रकारामुळे गावातील शांतता, कायदा व सुव्यवस्था आणि तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आले असून संबंधित यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

गावातील युवकांनी इशारा दिला आहे की, येत्या दोन दिवसांत अवैध दारू विक्रीवर प्रभावी कारवाई करून हा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आला नाही, तर थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच आवश्यक असल्यास आंदोलनाचा मार्गही अवलंबण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई करून या अवैध धंद्याला कायमचा आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

वारंवार पोलीस स्टेशन यांना सूचना देऊन सुद्धा संबंधित दारू विक्रेते कसं काय दारू विक्री करतात आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे हे सुद्धा समजण्याच्या पलीकडे आहे आणि काही वेळा तर या  दारू विक्रेत्यांची दारू जप्त करून त्यांच्यावर कार्यवाही करून सुद्धा ते अजून कसे काय दारू विकतात याचा पोलिसांनी कसून शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कार्यवाही करून त्यांचा कायम बंदोबस्त केला पाहिजे.

“कुंटूर पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने” हा आरोप संबंधित युवकांचा असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत संबंधित पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Related Articles

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून जि.प. शिक्षकाची मुलासह नदीत उडी घेऊन आत्महत्या.

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क - नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथील रहिवासी असलेले शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह, सारा (१२) आणि...

रूई (बु.)येथील अवैध दारु विक्री संदर्भात… महिलांचा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनात एल्गार…

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क - नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे रुई (बु.) येथे अवैधरित्या सुरू असलेल्या देशी दारू विक्रीने गावातील सामाजिक वातावरण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!