spot_img
spot_img
spot_img
spot_img

नायगावात पुन्हा धाडसी घरफोडी; 9 लाख 70 हजारांची रोकड लंपास, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह?

नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क –

नायगाव, दि. 29 : नायगाव शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून आणखी एका धाडसी घरफोडीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 9 लाख 70 हजार रुपयांची रोकड लंपास करून पोबारा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती नायगाव येथील कर्मचारी माधव कोठकर हे व्यंकटेश नगर परिसरातील भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी प्लॉट खरेदीसाठी साठवून ठेवलेली 9 लाख 70 हजार रुपयांची रोकड घरात ठेवली होती. दरम्यान, ते बाहेरगावी गेले असताना 28 जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोकड घेऊन फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नायगाव शहरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर रात्रीची पोलिस गस्त, सीसीटीव्ही यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी आणि गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार होणाऱ्या घरफोड्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून जि.प. शिक्षकाची मुलासह नदीत उडी घेऊन आत्महत्या.

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क - नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथील रहिवासी असलेले शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह, सारा (१२) आणि...

रूई (बु.)येथील अवैध दारु विक्री संदर्भात… महिलांचा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनात एल्गार…

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क - नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे रुई (बु.) येथे अवैधरित्या सुरू असलेल्या देशी दारू विक्रीने गावातील सामाजिक वातावरण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!