spot_img
spot_img
spot_img
spot_img

मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत ‘अक्षम्य’ चुका, शिवसैनिकांचा संताप अनावर!

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत अक्षम्य चुका आढळून आल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पददेखिल यात चुकविण्यात आले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष असे पद त्यांच्या नावासमोर लिहिण्यात आले आहे.

कल्याणमधून लोकसभेवर निवडून गेलेले उच्च शिक्षित खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे एस. एस. ऑर्थोपेडिक आहेत. पण त्यांच्या नावासमोर डॉक्टर लिहिण्यात आलेले नाही. विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांचे नाव चक्क पाठक असे लिहिण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली येथील नामवंत आणि अनुभवीत व्यक्तिंना डावलून मर्जीतील लोकांना संमेलनाच्या नियोजन समितीत स्थान देण्यात आल्याने या चुका झाल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे. दरम्यान, आयोजकांनी लगेच या चुका सुधाराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई शेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक : पणन संचालकांचा इशारा

  नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क- दि. ३ जून : राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ आणि नियम, १९६७ अंतर्गत...

राजसेतू कन्स्ट्रक्शनच्या गचाळ कारभारामुळे नायगावकर त्रस्त.

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क - नायगाव शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये राजसेतू कन्स्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!