डॉ.मीनलताई खतगावकर यांच्या जन सन्मान दौऱ्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद…
कुंटूर प्रतिनिधी – दिगंबर झुंबाडे
महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वत्रिक निवडणूक 2024 चे बिगुल वाजले असून त्याच अनुषंगाने 89 विधानसभ मतदारसंघांमध्ये नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या जन सन्मान दौरा व मतदारांना हितगुज करण्याकरिता महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मा. डॉ. मीनल ताई खतगावकर यांनी गाव भेटी दौरा सुरू केले असून सदर गाव भेटी दौऱ्याला मतदार संघातील जनसामान्य गोरगरीब,व्यापारी, व शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, या सह विविध समाज बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
डॉक्टर मीनल ताई खतगावकर हे उच्चशिक्षित व अभ्यासू व संयमी नेतृत्व असल्याने नायगाव मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांचा कौल मात्र मा डॉ. मीनलताई खतगावकर यांच्याकडे जाताना दिसून येत आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीपासून डॉक्टर मीनलताई खतगावकर यांचा जनसंपर्क नायगाव विधानसभा मध्ये मोठ्या प्रमाणात असून आणि माननीय माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे जनाधार मोठ्या प्रमाणात असल्याने याचाच फायदा नायगाव विधानसभा मध्ये महाविकास आघाडीला होण्याची दाट शक्यता असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. नायगाव मतदार संघातील जनसामाने व शेतकरी गोरगरीब यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याची क्षमता असलेले गोरगरीब व शेतकऱ्यांची जाण असणारे नायगाव विधानसभा मतदारसंघातील आश्वासक चेहरा म्हणून डॉक्टर मीनलताई खतगावकर यांच्याकडे पाहिले जात आहे. डॉक्टर मीनलताई खतगावकर हे सूक्ष्मदर्शी शांत स्वभावाचे असून जिल्ह्यातील राजकारणाचा गाडे अभ्यास व मतदार संघाचा चांगलाच अनुभव असून स्व.लोकनेते माजी खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांचे जवळचे सबंध राहिलेल्या डॉक्टर मीनल ताई खतगावकर हे परिचय असून होऊ घातलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भविष्यात नेतृत्व करण्याची संधी मतदारसंघातील मतदारांनी निश्चितपणे देतील असा ठाम विश्वास मतदार संघातील जनसामान्यांकडून होताना दिसून येत आहे.
स्वर्गीय वसंतराव पाटील चव्हाण यांचे नायगाव मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा जनाधार मागील लोकसभा निवडणुकीमध्ये उसळलेला होता स्वर्गीय चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यातील मतदार यांनी पाच वर्षासाठी जिल्ह्याची सेवा करण्यासाठी संधी दिली असता दुर्दैवाने स्वर्गीय वसंतरावजी पाटील चव्हाण यांना काळाने हिरावून नेले असून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता त्यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून त्यांच्या उमेदवारीची जाहीरपणे घोषणा केली असून निश्चितपणे नांदेड जिल्हा लोकसभा पोटनिवडणुकीत प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्या मागे मोठ्या प्रमाणात जनाधार असून व सहानुभूतीची लाट देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यात एकच चर्चा नांदेड लोकसभा मध्ये प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण तर नायगाव विधानसभा मतदारसंघात डॉक्टर मीलमताई खतगांवकर हेच एकमेव सक्षम उमेदवार असून यांना निश्चितपणे विजय करून देण्याकरिता जिल्ह्यातील व नायगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने निवडणूक हाती घेतलेले आहे अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व स्वर्गीय वसंतराव पाटील चव्हाण यांचे विकास कामांमध्ये मोठे योगदान राहिले असून त्यांच्या प्रति नांदेड जिल्ह्यातील तमाम मतदार विजयाचे संकेत दिले आहे.
भाजपमुळे देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय द्वेष निर्माण करून समाजा समाजात दंगली भडकवण्याचे काम केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांच्याकडून जातीय द्वेष्याचे षड्यंत्र रचून जाती-जातीमध्ये वाद विवाद निर्माण करण्याच्या हेतू पुरस्काराने मोठ्या प्रमाणात विद्यमान आमदार यांच्या विरुद्ध नाराजीचा सूर असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मतदार संघातील मुख्य विषयाकडे कुठल्याच प्रकारचे नियोजन नसून केवळ पोकळ आश्वासनाच्या जोरावर आणि मतदारसंघातील मतदारांना सरकारच्या योजना च्या दूर उपयोग करून मतदारांना संभ्रम अवस्थेत आणि भावनिक साद घालण्याचे देखील मोठ्या प्रमाणात षडयंत्र चालू आहे. म्हणून मतदार संघातील विद्यमान आमदार यांच्या विरुद्ध मोठी नाराजीची लाट असून त्यांना निश्चितपणे पराभवाला समोर जावे लागणार अशा प्रकारच्या चर्चा मात्र आता मतदारसंघात होताना दिसून येत आहे.
जन सन्मान दौऱ्याच्या निमित्ताने हुस्सा ,सालेगाव,धनंज,मेळगाव,परडवाडी,चारवाडी, डोंगरगाव आदी गावामध्ये डॉक्टर मीनल ताई खतगावकर यांनी भेट देऊन गावातील मतदारांना हितगुज साधून गावातील अडीअडचणी समजावून घेऊन भविष्यामध्ये गावातील सर्व प्रश्न सोडविण्यास मी स्वतः कट्टीबद्ध राहील असा हा मी विश्वास गावकऱ्यांना देण्यात आला आहे. कार्यक्रम दरम्यान बाळासाहेब पाटील कवडे, माधवराव पाटील हिवराळे शिंगणापूरकर, गोविंद पाटील हसेकर, सुरेश पाटील कदम,मंगल देशमुख अलुरकर, हनुमंत पाटील बामणीकर, सुरेश पाटील खाणगावकर, गंगाधर पाटील, बाळू पाटील मुदखडे, प्रदिप पाटील जाधव सालेगावकर , मोहनराव पाटील शिंदे सर,लक्ष्मण पैलवान , रामराव लव्हाळे,शामराव पाटील, या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोकराव पाटील हंबर्डे शरद पाटील हंबर्डे रमेश पाटील हंबर्डे रावसाहेब पाटील शिंदे गुलाबराव पाटील हंबर्डे परमपूज्य विश्वास बुवा मेहकरकर, रामदास दशरथ हंबर्डे, शंकर दतराम हंबर्डे, रमेश जालनेकर नागोराव जालणेकर ,बापूराव हंबर्डे, शंकर वाघमारे,माधव वाघमारे, गंगाधर वाघमारे, किशोर हंबर्डे, दतराम पा. हंबर्डे, संजयराव हंबर्डे, प्रल्हाद हंबर्डे,सह गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.