प्राचार्य मनोहर तोटरे यांची भाजपला सोडचिट्टी मा. खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या उपस्थीतीत काँग्रेसमध्ये प्रवेश,आ.पवार याना धक्का !
नायगाव – तनाजी शेळगांवकर
मातंग दलीत चळवळीतील सक्रीय युवा नेते प्राचार्य मनोहर तोटरे यांनी भाजपाला राम-राम करत काँग्रेस पक्षात काँग्रेसचे जेष्ठनेते मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर व माजी आ. अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलाआहे.परवाच आ.राजेश पवार यांच्या साठी मोठी आंनाभाऊ ची जयंती गावात घेणारे प्राचार्य तोटरे काँग्रेस मध्ये गेल्याने आ. राजेश पवार याना आडचन निर्माण झाली आहे.
नायगाव तालुक्यातील शेळगांव गौरी येथील उच्चविद्याविभुषीत मातंग समाजीतील तरुण व्यक्तीमत्व असलेले शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेडचे प्राचार्य मनोहर तोटरे यांनी गावात प्रस्थापीत विरुध्द सर्व समाजघटकातील समाजाला व युवा वर्गाला सोबत घेऊन ग्रामपंचायत निवडणुक लढवली आणि प्रस्थापीतांना धक्का देत मनोहर तोटरे हे सरपंच पदी विराजमान झाले होते.
प्राचार्य मनोहर तोटरे हे सरपंच पदी विराजमान होताच इतर समाजातील तरुणांना देखील त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी सातत्याने केले मात्र भाजपाच्या मनुवादी नेतृत्वाने यांच्याकडे दर्लक्षच केले. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजीमंत्री खा. भास्करराव पाटील खतगावकर माजी आ. अविनाश घाटे व माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांच्या उपस्थीतीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला असुन येणा-या विधानसभा निवडणुकीत नायगांव मधुन डॉ. मीनलताई पाटील खतगांवकर देगलूर मधुन अविनाश घाटे व लोकसभा पोटनिवडणुकीत प्रा. रविंद्र पाटील चव्हाण यांना निवडुन आणण्यासाठी मी सर्व सहकारी कार्यकर्ते व सरपंचासह सर्वाना सोबत घेऊन काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्नशील राहीन त्यानी असे यावेळी सांगीतले.
तोटरे यांच्या प्रवेशाने शेळगावकर आडचनीत
नायगाव तालुक्यातील उलथापालथी चे राजकारणात बीलोली पोट निवडणुकीत भाजप मध्ये असलेले माधवराव पाटील शेळगावकर हे आशोकंराव चव्हाण यांच्या वर विश्वास ठेऊन काँग्रेस मध्ये गेले.आता ही ते काँग्रेस मध्येच असून काँग्रेस च्या तिकिटाच्या मागणीत त्यांचे चिरंजीव प्रा .संजय पाटील आग्रेसर आहेत.खतगावकर यांनी शेळगावकर यांचे कट्टर विरोधक प्राचार्य तोटरे याना काँग्रेस मध्ये प्रve शित केल्याने शेळगाव कर पिता पुत्र काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.