मराठी पत्रकार परिषदेचे MMP News युट्युब चैनल लाँच … डिजिटल मिडीया परीषद राज्यस्तरीय कार्यशाळेत एस.एम.देशमुख यांची घोषणा !
पुणे प्रतीनिधी / गंगाधर गंगासागरे
पत्रकारांची मात्र संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबई या संस्थेच्या वतीने MMP News या नावाने युट्युब चॅनेल ची दमदार सुरुवात केली असून आज पुणे येथे आयोजित डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते रिमोट दाबून उद्घाटन करण्यात आले आहे.
मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद यांच्या वतीने पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पुणे येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये 20 सप्टेंबर रोजी पार पडली असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्युज 4 PM चे संपादक संजय शर्मा लखनौ यांची उपस्थिती होती त्याचबरोबर विचार मंचावर पुणे जिल्हाध्यक्ष शरद पाबळे , निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे , जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर वर्षाताई पाटोळे,असीम सरोदे , गिरीश देसाई , राजेंद्र वाघमारे , संतोष शिंदे , गणेश मोकासे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेची भूमिका मांडत असताना एस. एम. देशमुख म्हणाले की मराठी पत्रकार परिषदेला 86 वर्षाचा वारसा आहे आज पर्यंतच्या कार्यकाळात आपली संस्था पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून बीड नगर राज्यस्तरीय वसंतराव काणे पुरस्कार देणे असेल अथवा पत्रकारावर संकटकाळी देखील खंबीरपणे साथ दिली असून आज पर्यंत 80 लाख रुपयाचं योगदान परिषदेने दिल आणि मराठी पत्रकार परिषद ही जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी सोबत राहील असे सांगून प्रत्येकाने काळाची पावले ओळखून डिजिटल मीडिया परिषद 28 जिल्ह्यांमध्ये सक्रिय झाली आहे तेव्हा आपण या क्षेत्रामध्ये स्वतःचे चॅनल आणून बदल स्वीकारावा असे आवाहन केले.
यावेळी लखनऊ उत्तर प्रदेश होऊन आलेले न्यूज फोर पीएम चे मुख्य संपादक यांनी मार्गदर्शन करीत असताना आजच्या बदलत्या युगामध्ये पत्रकारांची भूमिका ही सजग असली पाहिजे आपण देशाचा महाराष्ट्राचा कॅमेरा हात चालू वर्तमान आणि भविष्य आपण सांगू शकता तेव्हा आपण सजग राहून प्रभावी भूमिका सा करावी असे आवाहन केले.
तर मॅक्स महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी डिजिटल पत्रकारिता करण्याविषयी सखोल मार्गदर्शन केले . यावेळी महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातून व तालुक्यातून डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .