नायगाव तालुक्यात मराठा आरक्षणाचा अजून एक बळी..
नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क – शेषेराव पाटील
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण अंकुश बाबुराव ढगे यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे निराशेतून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे..
सुशिक्षित बेरोजगार असून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता परंतु सरकारच्या मराठा समाजा संदर्भातील उदासीन धोरणामुळे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे तो नेहमी तणावात राहत होता.
काल दिनांक 18/9/ 2024 रोजी सायंकाळी ठीक 9.00 वाजताच्या दरम्यान शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
आत्महत्या करण्यापूर्वी आपली परिस्थिती खुप हलाखीची असून मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नौकरी लागत नाही त्यामुळे मी स्वतः समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत आहे अशी चिठी लिहून सदरील तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली आहे..
की
आजपर्यंत मराठा आरक्षण मिळावे म्हणून नायगाव तालुक्यातील 9 तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली आहे.
दैनंदिन अशा घटना घडत असताना सुध्दा या निर्दयी शासनाला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेळ मिळत नाही.
त्यामुळे सरकार अजून किती युवकांचे बळी घेणार आहे असा सवाल मराठा समाजातील तरुण या सरकारला विचारत आहेत.
यावेळी नायगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाचे चंद्रकांत पाटील पवार रावसाहेब पाटील शिंदे साई पाटील मोरे शेषेराव पाटील बेलकर व यासह असंख्य समाज बांधव शासनाचा निषेध करण्यासाठी उपस्थित होते