नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण.




 

नायगाव / प्रतिनिधी  रामप्रसाद चन्नावार 

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दि. १७ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे प्रांत अध्यक्ष रामेश्वर वाघमारे यांनी दिली आहे.

नवीन नगरपंचायत कर्मचाऱ्यांना उद्ध घोषणेच्या दिनांका पासून वेतनाचा फरक द्यावा, तत्कालीन ग्रामपंचायत मधील नवीन नगरपंचायत मध्ये समावेशन प्रक्रियेमधील परिशिष्ट ए मध्ये समाविष्ट केलेल्या कर्मचाऱ्यांचे समावेशन करावे, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन,रजावेतन अंशदानाची रक्कम नवीन नगरपंचायत मधील समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत अंशदान व अर्ज, वेतन व द्यावी, कालीन सेवा ही सेवानिवृत्ती व इतर लाभासाठी ग्राह्य धरावी, नगरपंचायत देवणी जिल्हा लातूर येथील पिंटू रघुनाथ सोनकांबळे या कर्मचाऱ्यास कायम करणे, नगरपंचायत माहूर जिल्हा कर्मचारी यांना कायम करणे,नांदेड येथील ग्रामपंचायत नायगाव नगरपंचायत जिल्हा अनर्हमुळे नामंजूर केलेल्याआदी मागण्यांबाबत महाराष्ट्र नांदेड येथील ९ कर्मचाऱ्यांना पदस्थापना देणे व शैक्षणिक २६ कर्मचाऱ्यांना कायम करणे राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यात आले आहे. मराठवाडा विभागातील नवीन नगरपंचायतमधील मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांचे संरक्षण करणे आणि मित्रा संस्थेचे प्रशिक्षण घेऊनही नवीन नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी होत असलेल्या विलंबा बाबत निषेध व्यक्त करण्यासाठी ,

महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेने औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १७ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणाचा मार्ग धरला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्यासाठी वारंवार जिल्हा विभाग व राज्यस्तरावर मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणून देखील शासन स्तरावरील प्रलंबित असलेल्या नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबून लागत असल्याचेही प्रदेश अध्यक्ष रामेश्वर वाघमारे व जिल्हा सरचिटणीस संतराम जाधव यांनी माध्यमांशी बोलतानां स्पष्ट करून.या सर्वांनी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे एक दिवशीय उपोषण केले.

या वेळी मा.रामेश्वर वाघमारे (प्रदेशाध्यक्ष व अन्याय ग्रस्त कर्मचारी संघटना ) संतराम जाधव (कार्यालयीन अधीक्षक नगर पंचायत नायगांव तथा जिल्हा सरचिटणीस )श्रीधर कोलमवार मुन्ना मंगरुळे शेख मौला अजय सुर्यवंशी साहेबराव चिंचोले लालबा भेंडेकर प्रथमेश भालेराव खुशाल सालेगाये व सर्व नगरपंचायत नायगाव चे कर्मचारी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment