कुंचेलीत दोन जणावरांना लंम्पी आजार.

प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शेजारच्या दहा गावात लसीकरण वेगाने सुरु.




 

 

नायगाव/शेषेराव कंधारे

नायगाव तालुक्यातील कुंचेली येथे लंम्पी संसर्गजन्य आजारांची दोन जनावरे सापडले असून मागील चार दिवसांत संसर्गजन्य रोगांमुळे चार जनावरे मृत्यू पावली आहेत त्यामुळे बाजुच्या दहा गावात संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून शुक्रवारी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जनावरांना लसीकरण व गोठा स्वच्छ करण्यासाठी औषधे वाटप करण्याचे काम वेगाने सुरूवात करण्यात आले आहे.

कुंचेली ता.नायगाव येथे जवळपास पंधरा दिवसांपासून जनावरांना भरपूर ताप येणे, डोळ्यांतून व नाकातून पाण्याचा स्राव होणे, चारा तसेच पाणी कमी पिणे, दुध कमी होणे, पायावर सूज, लंगडणे तसेच अंगावर छोटया मोठया गाठी येणे असे आजारांची सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळपास पंधरा दिवसांपासून डॉक्टरांना बोलवुन उपचार करून घेत आहेत परंतु वरच्यावर चार रोगाचा प्रार्दुभाव वेगाने वाढत असल्याने नारायण बावलगावे यांचें दोन गायी , शेषेराव शिंपाळे आणि रमेश बावलगावे यांचा प्रत्येकी एक बैल मृत्यू झाला आहे.सध्या गावातील जवळपास पंधरा जणांवर उपचार घेत असुन पशुसंवर्धन विभागांचे अधिकारी या गावात तळटोकुण जनावरांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे सध्या दोन दिवसांपासून मृतांची संख्या कमी झाली आहे.

        कुंचेली गावात मागिल पांच दिवसांपूर्वी पांच जनावरांचे सॅम्पल घेऊन पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते त्यापैकी दोन जनावरांचे पाॅजिटीव रिपोर्ट आले आहेत.

त्यामुळे उर्वरित गुरांच्या रोगाचा प्रार्दुभाव वेगाने पसरू नये यासाठी गावातील संपूर्ण जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे त्याच बरोबर बाजुच्या पांच किलोमीटर अंतरावरील धुप्पा, रामतीर्थ,हिप्परगा माळ, धानोरा येथील गावात शुक्रवारी बाहेरून डाॅक्टरची टिम बोलुन लसीकरण वेगाने सुरू करण्यात आले असून बाकीच्या गावात लवकरच लसीकरण करण्यात येणार आहे. आजारावर लवकर उपचार सुरू करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शेतकऱ्यांनी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवा आणि अशा रोगांची लक्षणे दिसुन आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन नायगावचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ.खिल्लारे यांनी केले आहे.

Comments (0)
Add Comment