ॠतुजा पाटील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय.

634

 

नायगाव/ शेषेराव कंधारे

श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी आयोजित माणिकनगर नांदेड येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत धुप्पा ता.नायगाव येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा दीपक पाटील हिने जिल्ह्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला असून तिच्या ह्या घवघवीत यशाबद्दल विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खा. डॉ. केशवजी धोंडगे यांच्या श्री.शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी या संस्थांतर्गत माणिक नगर नांदेड येथील श्री.शिवाजी जुनिअर कॉलेजमध्ये दि.८ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मातोश्री स्व सौ. सुलोचनाताई कुरुडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेत संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धुप्पा ता.नायगाव येथील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकत असलेली कु. ऋतुजा दीपक पाटील हिने जिल्ह्यात द्वितीय येण्याचा बहुमान मिळविला आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुनाथ रावजी कुरुडे,नांदेडच्या महापौर राजश्रीताई पावडे,राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिग्रसकर, जेष्ठ साहित्यिक डॉ.हनुमंत भोपाळे, प्राचार्य संजय पाटील शेळगावकर सह आदीं मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र रोख रक्कम व ग्रंथ भेट देऊन ऋतुजाला गौरवण्यात आले.

घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा स्वच्छता दुत माधवराव पाटील शेळगावकर, संस्थेचे सचिव तथा उपक्रमशील प्राचार्य संजय पाटील शेळगावकर, प्राध्यापिका सौ.सरोजताई पाटील, विजय पाटील, दिपक पाटील,शाळेतील
समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.