मराठवाडा पिठ सिमुरगव्हान येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा.




 

नायगाव/ शेषेराव कंधारे

अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यासह विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन मंगळवार व बुधवार दि.१३ व १४ सप्टेंबर २०२२ रोजी श्री.क्षेत्र माऊली माहेर मराठवाडा उपपिठ सिमुरगव्हान तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठवाडा पीठाचे पीठ प्रमुख गणेश मोरे व्यवस्थापक सुमित लंके पीठ समिती सदस्य व नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे.

          या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, हिंदू संग्राम सैनिक, युवा सेना, महीला सेना सर्व तालुकाप्रमुख व सेवा केंद्र सदस्य, आरती कमिटीतील सदस्य मंडळी व भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी १३ व १४ सप्टेंबर रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी श्री.क्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हाण येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमा बरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. 

संस्थानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.यामध्ये नाणिजधाम येथे शालेय विद्यार्थ्यांना विनामुल्य विद्यालयीन ते महाविद्यालयीन मोफत शिक्षण दिले जाते.सामाजिक अध्यात्मीक,शैक्षणिक तसेच निराधार महिलांना शिलाई मशिन वाटप,शेतकऱ्यांना कृषि साहित्य वाटप,गायी म्हेस, शेळी वाटप असे अनेक उपक्रम राबविले जातात . कोरोना काळात मुख्यमंत्री व प्रधानमंञी निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली असुन अपघात ग्रस्तांसाठी विनामुल्य तीस रूग्णवाहीका चौवीस तास हायवेवरती सेवा देत आहेत त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत असे विविध उपक्रम राबविले जातात. दि.१३ व १४ सप्टेंबर या दोन्ही दिवशी कार्यक्रमात परमश्रद्धेय जगद्गुरुश्रींचे अमृततुल्य असे अनमोल अध्यात्मिक विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंगळवार व बुधवार असे दोन्ही दिवस महाप्रसादाची व्यवस्था मोफत केलेली आहे. तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मराठवाडा पीठाचे पीठ प्रमुख गणेश मोरे ,व्यवस्थापक सुमित लंके,पिठ समिती सदस्य व नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.

Comments (0)
Add Comment