भीमाकोरेगाव प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावलेल्या पीडित भीम सैनिकांना वंचित बहुजन आघाडी तर्फे आर्थिक मदत.




 

 

 

नांदेड एक्स्प्रेस न्यूज नेटवर्क

दि.11 जुलै 2022 रोजी नांदेड सत्र न्यायालयाने, भीमा कोरेगाव प्रकरणी, तामासा, हदगाव येथील 26 भीम सैनिकांना 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली होती. या प्रकणात सर्वपतरी कायदेशीर व आर्थिक मदत करण्याचे आश्वासन आद. बाळासाहेब आंबेडकरांनी दिले होते. त्यानुसार त्यांच्या आदेशाने दि. 2 सप्टेंबर 2022 रोजी तामासा येथे पीडित आरोपीना भेट देऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकूण 25 जणांना आर्थिक मदत पोहच केली आहे. या प्रसंगी भावुक होऊन अनेकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्या पैकी काहींनी आम्ही सर्व पीडित आरोपी गरीब असून मोलमजुरी करुन पोट भरतो. आमच्या सारख्या सामान्य, गरीब लोकांची बाळासाहेब आपुलकीने चौकशी करतात, आर्थिक मदत पाठवतात हे आमच्या साठी स्वप्नवत असून आम्ही आयुष्यभर बाळासाहेबांचे ऋणी राहू अशा भावना व्यक्त केल्या तर काहींनी आमच्या पिढीने बाबासाहेबांना तर पाहिलेले नाही परंतु आम्ही बाळासाहेबांना पाहिलेले आहे हे आमचे भाग्य असून त्यांनी दिलेली मदत ही त्यांची निशाणी म्हणून आम्ही जपू अशा भावना व्यक्त केल्या तर काहीनीं बाळासाहेबांची मदत ही आमच्या साठी आशीर्वाद असल्याचे सांगितले. तर आता बाळासाहेब सोबत असल्याने आम्ही निश्चिन्त असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.*

 

या प्रसंगी वंचितचे प्राद्यापक राज अटकोरे सरांनी सांगितले की नांदेड शहर भारतातील शिक्षण क्षेत्रातील कामगिरीत आघाडीवर असून नांदेड मध्ये 50 हजार ते 1 लाख पर्यंत कोचिंग क्लासेसच्या फी आकारल्या जातात.परंतु भीम सैनिकांच्या कुटुंबातील इयत्ता दहावी व बारावीला शिकणाऱ्या मुलांना/ मुलींना वंचित बहुजन आघाडी तर्फे कोचिंग क्लासेस मोफत उपलब्ध करुन देऊ व इतर वर्गात शिकणाऱ्या मुलांना / मुलींना मोफत शैक्षणिक सामग्री उपलब्ध करुन देऊ. त्यामुळे भीम सैनिकांच्या कुटुंबियांना मोफत कायदेशीर व शैक्षणिक मदती सोबत आर्थिक मदतही उपलब्ध करून दिल्याने सर्वांनी बाळासाहेबांचे मनापासून आभार व्यक्त केल.

या प्रसंगी वंचितचे कार्यकर्ते सुनील भाऊ सोनसळे व गंगाधर भाऊ पवार सुद्धा उपस्थित होते. या प्रकरणात समन्व्य साधण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. हा आपल्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा लढा असल्याने केसेस दाखल असलेल्या चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यां सोबत बाळासाहेब व वंचित बहुजन आघाडी ठाम पणे उभी आहे व त्यासाठी पक्षाची वकील आघाडी सक्रिय आहे. आद. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखी ही न्यायालयीन लढाई सुरु ठेवू. यश नक्कीच मिळेल.

Comments (0)
Add Comment