ब्लू बेल्स ची विद्यार्थिनी स्नेहा जमदाडेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.

134

 

नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्‍नावार )

    नायगांव येथील ब्लू बेल्स इंग्लिश स्कुल ची विद्यार्थिनी स्नेहा जमदाडे हिने सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले होते यामुळे दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे स्नेहाला मा.जिल्हाधिकारी विपीन ईटणकर यांच्या हस्ते सनेहाला प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले यामुळे तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ब्लू बेल्स इंग्लिश स्कूल इयत्ता 5 पाचवी ची विद्यार्थ्यानी स्नेहा जमदाडे हि जिल्ह्यात प्रथम तर राज्यात दहावा क्रमांक पटकावून शैक्षणिक यश संपादन करून शाळेचे नाव लौकीक केले होते यामुळे तिच्या या यशाबद्दल दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी मा.जिल्हाधिकारी विपीन ईटणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तीच्या या गौरवा बद्दल ब्लु बेल्स इंग्लिश स्कुलचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.के.हरीबाबू सर,मुख्याध्यापिका सौ.सीतामहालक्ष्मी कोपेल्लू,पर्यवेक्षिका साईदिप्ती कोपेल्लू‌,दत्ता कंदूरके सर,कानगुले सर यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.