सोनखेड जि. प. केंद्रिय शाळा शालेय व्य. समितीची बिनविरोध निवड.
नांदेड – आनंद गोडबोले
आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळा सोनखेड येथे शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली.
जि प के प्रा शा सोनखेड च्या समितीवर श्री. गोविंदराव नामदेवराव मोरे यांची अध्यक्ष तर श्री गजानन भगवानराव मोरे यांची उपाध्यक्ष तसेच जि प कन्या शाळेत श्री शंकरराव एकनाथराव मोरे यांची अध्यक्ष व श्री शशिकांत भाऊसाहेब पांडे यांनी उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. दोन्ही शाळेच्या समितीवर इतर सदस्यांची प्रवर्ग निहाय निवड करण्यात आली.या निवड प्रक्रिये साठी ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच मा.श्री . अच्युतराव मोरे साहेब व उपसरपंच मा.श्री . प्रविण मोरे सर यांचे सहकार्य लाभले.
आजच्या निवड प्रक्रियेत सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री अमीन पठाण सर यांनीही सहभाग नोंदविला व त्यांची कन्या शाळेच्या शिक्षण तज्ञ पदावर नियुक्ती करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. दोन्ही शाळेच्या वतीने नवनियुक्त सर्व सदस्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.