कै.अंबादासराव पाटिल लुंगारे यांच्या स्मरणार्थ कहाळा येथे पाणपोईचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्द्घाटन. .




 

नायगाव/ शेषेराव कंधारे

सध्या सर्वत्र उन्हाचा पारा अचानक वाढल्या असल्याकारणाने अंगाची लाही लाही होत असल्याने कहाळा बु येथील कै.अंबादासराव पाटिल लुंगारे यांच्या स्मरणार्थ सुपुत्र सुनिल पाटील लुगारे यांनी नांदेड नायगाव हाइव रोडवरील कहाळा बु येथे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पाणपोई सुरू केली आहे. याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.

कहाळा बु येथील आजूबाजूच्या गावातून दररोज येणार्या नागरिकांची संख्याही भरपूर असते कोणी पाण्याची वीस रुपयाची बॉटल घेऊ शकतो तर कोणाची घेण्याची परिस्थिती राहत नाही अश्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी स्वर्गवासी अंबादासराव पाटिल लुंगारे यांच्या स्मरणार्थ काहीतरी पुण्य भेटावे या उदात हेतुने गेले दहा वर्षा पासून परीसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी थंड पाण्याच्या पाणपोई चे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुनील पाटील लुगारे,मा.सरपंच सौ.प्रतिभाताई लुगारे, डॉ.माधवराव पा कहाळेकर, सरपंच जावेद शेख,वसिद सय्यद, अकबर पटेल, उत्तमराव पा.जाधव, ज्ञानेश्वर पा.जाधव, दत्ता चव्हाण,मकदुम सय्यद,फेरोज शेख सह आदींची उपस्थिती होती, पाणपोई सुरू झाल्यामुळे नागरीकातुन समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments (0)
Add Comment