डॉ.प्रभाकर रामचंद्र बोरगावकर यांना विवेकानंद पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

164

बिलोली प्रतिनीधी -रवी कांबळे

नांदेड जिल्ह्यातील व बिलोली तालुक्यातील बोरगावचे भुमिपुत्र हे पुणे शहरातील आर्दश बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालयातील माझी विद्यार्थी व प्रा.डॉ.प्रभाकर बोरगावकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विवेकानंद आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

आंध्र प्रदेशातील लोकहित संस्थेमार्फत स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त हैद्राबाद येथे आयोजित पुरस्कार वितरण संमारंभात देशातील कांही निवडक व्यक्तीनां या पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यात डॉ.बोरगावकर यांच्या समावेश होता.डॉ बोरगावकर यांना आतापर्यंत महाराष्ट्र मध्यप्रदेश,गोवा,आंध्रप्रदेशातील ,तेलंगना कर्नाटक ,ओरिसा,आंध्रप्रदेश आणि तमिळनाडु या राज्यातील विविध संस्थानी विविध स्ततावरील पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच ” नॕशनल काॕनिसल फार टिचर एज्युकेशन ,दिल्ली मार्फत बंगोलर.भोपाळ.भुवनेश्वर आणि जयपूर या विभागातील क्षेत्रात येणाऱ्या एकुण ३६ शैक्षणिक संस्थेच्या तपासणीचे काम डॉ बोरगावकर यांनी केले आहे.

- Advertisement -

म्हणून त्यांचे मित्र परिवाराकडुन अभिनंदन व शुभेच्छा देऊन या नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बोरगावचे भुमिपुत्र बोरगागावकर यांचे सर्व सामाजिक व राजकीय नेते मंडळीने तसेच मान्यवर व विविध क्षेत्रातील मित्र या पंचकृषित अभिनंदन व देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिले . नगरसेवक तथा पत्रकार प्रकाश पोवाडे .उपसंपादक सुनिल कदम. मित्र व बोरगाव नगरीचे संरपंच – संजय मुडकर .उपसंरपंच प्रकाश पाटील मटके,लक्ष्मणराव मुंडकर,प्रशात बोरगावकर. जयवंत बोरगावकर.रवि कांबळे आदीसह मित्र परिवाराच्याकडून
कौतुक या पंचकृषित शुभेच्छाचे वर्षाव मित्राकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.