राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नायगाव तहसील विभागा मार्फत विविध स्पर्धांचे आयोजन

175

 

नायगाव/शेषेराव कंधारे

भारत निवडणूक आयोगाची २५ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली असून हा दिवस संपूर्ण देशभरात “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवा म्हणून जनजागृतीसाठी केली जात आहे.

- Advertisement -

यादृष्टीने दि.२५ जानेवारी रोजी नायगाव तहसील विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून बेटकबिलोली, देगांव, घुंगराळा, कुष्णूर, बरबडा, कन्या शाळा नायगांव बा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आकाशकंदील तयार करणे, भिंतीपत्रक स्पर्धा तसेच चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जे विद्यार्थी प्रथम व द्वितीय क्रमांक येतील त्यां विद्यार्थ्यांना तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

नायगांव (खै.) तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वी या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षरामध्ये (संकल्पपत्र उपक्रम) तयार करून घ्यावयाचे आहेत. सदर सर्व संकल्प पत्रे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालयात या कार्यालयामार्फत जमा करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम २५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याबाबत नायगांव तालुक्यातील (सर्व कार्यालय प्रमुख) यांना मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील प्रतीसह देऊन सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोव्हिड- १९ संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करून आपल्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, असे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लेखी पत्र देण्यात आले आहेत.

नायगाव तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर १७० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा बी.एल.ओ. यांच्या मार्फत या दिवशी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याबाबत त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील प्रती देऊन सहद्यस्थितीत सुरू असलेल्या कोव्हिड १९ संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करून शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, असे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लेखी पत्र देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.