भारतीय मराठा महासंघाच्या वतीने माॅ जिजाऊ साहेब जन्मोत्सव सोहळा मौ. होटाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा.

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील होटाळकर यांच्या वतीने शालेय साहित्य व गरजूंना चादरी वाटप




 

 

नायगांव /प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

होटाळा येथे भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित माॅ साहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बन्सी दादा डोके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मौ होटाळा येथे दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी माॅ साहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गटशिक्षणाधिकारी पवळे सर. प्रमुख पाहुणे.भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयदीप दादा वरखिंडे . प्रमुख उपस्थिती गणेश भद्रे उपसरपंच होटाळा. दत्ता पाटील माजी सरपंच बापूराव पाटील माजी उपसरपंच बालाजी पाटील पवार नरसी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष साईनाथ दशरथ पाटील पवार .विठ्ठल गवळी. तुकाराम पाटील जाधव .उमरी तालुका अध्यक्ष कंधार तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील ताटे मुखेड तालुका अध्यक्ष नागनाथ पाटील बेळेकर बालाजी पाटील देगलूरकर तालुका उपाध्यक्ष नायगाव तालुका अध्यक्ष परमेश्वर पाटील जाधव शिवाजी पाटील सातेगावकर देगलूर बिलोली उमरी मुखेड कंधार तालुक्यातील सर्व पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय मराठा महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार यांनी पुढे बोलतांना म्हणाले की म्हणाले भारतीय मराठा महासंघ ही सामाजिक संघटना असून सर्वधर्मसमभाव प्रमाणे न्याय देण्याचे काम करणारी व समाजावर होणारा अन्याय खपून घेणार नाही.

माझ्यावर प्रेम करणारे सर्व पत्रकार बंधू गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे व गावातील जिल्हा परिषदेचे शिक्षक सर्वांनी कार्यक्रमाला खूप परिश्रम घेतला आहे. राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ जन्मोत्सव व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बन्सी दादा डोके यांच्या वाढदिवसा निमित्ताने शालेय साहित्याचे वाटप पेन वही फळवाटप पत्रकारांचा सन्मान आणि गरजूंना चादरी वाटप करण्यास मला मदत केली अशा भावना व्यक्त केल्या.विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.

Comments (0)
Add Comment