नायगांव नगरपंचायतच्या 3 जागेसाठी 13 उमेदवार रिंगणात.

शेवटच्या दिवसापर्यंत 8 उमेदवारांनी घेतली माघार.

358

 

नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित नायगांव नगरपंचायत निवडणूक अटीतटीची व रंगतदार होत असून 14 जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झाले असून बाकी 3 जागेसाठी येत्या 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी एकूण 13 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहेे.

- Advertisement -

18 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 21 उमेदवाराचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. 10 जानेवारी हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसा पर्यंत एकूण 8 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून 3 जागेसाठी 13 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

प्रभाग क्र. 7 मध्ये पठाण आबीदाबी मौलाखा, पोटफोडे संगीता सुभाष, सय्यद सखरी हजीसाब यात भाजपा, एनसीपी अन् काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे.

प्रभाग क्र. 11 मध्ये बेळगे विठ्ठल लक्ष्मण, भालेराव गणेश पुंडलिक, भालेराव मंगल प्रवीण, माधव लक्ष्मण नायगावकर, वाघमारे यादव मारोती,सय्यद जलाल साब नजीर यात काँग्रेस एनसीपी भाजपचा प्रत्येकी एक उमेदवार असून 3 अपक्ष उमेदवार आहेत. ही लढत अपक्षामुळे अटीतटीची होणार असल्याचे चित्र आहे.

प्रभाग क्र. 17 मध्ये गायकवाड सुहासनी दत्ता, वन्ने अनुसयाबाई विश्वंभर, शेख मरियांबी नजीर,शेख रबियाबी बाबू यात भाजपा, काँग्रेस, एनसीपी अन् अपक्ष अशी चौरंगी लढत असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.