बिलोली तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा.




 

 

बिलोली – रवी कांबळे

बिलोली तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन 30 डिसेंबर रोज गुरुवारी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा सदस्य राजु लाभशेटवार तर प्रमुख उपस्थिती पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार उत्तम निलावाड,ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे बिलोली तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.गोपाळ चौधरी,तालुका सचिव माधव फुलारी , तालुका संघटक इंद्रजीत तुडमे अदि होते. प्रा.डॉ.गोपाळचौधरी हे बोलतांना म्हणाले की ग्राहकांने कोणतेही वस्तू घेत असतांना त्याची किंमत पाहावी तसेच दुकानदाराने फसवणूक केल्यास त्यांची तक्रार करावी.
वस्तू घेताना पावतीची अत्यंत गरज असते. त्यामुळे आपण पावती घेऊनच मालाचे पैसे द्यावे निष्काळजीपणा करू नये
असे बोलत होते. या वेळी आनंतराव खानापुरकर ,सय्यद रियाज, रास्त दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष शेख मौला , बालाजी पाटील कदम, तहसिलचे अत्तारसर, सुर्यवंशी यांच्या सह अनेक जन उपस्थित होते.प्रास्ताविक व सुञसंचालन गंगाराम पाटील यांनी केले

Comments (0)
Add Comment