बिलोली तालूक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान.

प्रशासणाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.




 

 

 

बिलोली प्रतिनीधी -रवी कांबळे

 

बूधवार दि.29 डिसेंबर रोजी रात्री तालूक्यातील सगरोळी,दौलतापूर,हिप्परगा (थडी),शिंपाळा,गंजगाव ,कारला आदी ठिकाणी पाऊस व गारपीठ झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नूसकान झाले आहे.त्यामूळे अगोदरच संकटात असलेल्या बळीराज्याचे कंबरडेच मोडले आहे.

    हवामान खात्याने दिलेला अंदाच खरा ठरला.पावसामूळे व गारपीठामूळे उभ्या पिकांचे व फळबाग पिकांचे मोठे नूसकान झाले.

तसेच तालूक्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी झाल्या त्यामूळे नांदेड जिल्हाचा शेतकरी पून्हा एकदा संकटात सापडला आहे.वर्षभर संतत पाऊस आणी पिकावरील रोगामूळे शेतकऱ्याच्या खर्च जाता दमडीही शिल्लक राहीली नाही.त्यामूळे शासनाने झालेल्या नूकसानीचे तात्काळ पंचनामे करून मोबदला द्यावा अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

 

Comments (0)
Add Comment