बिलोलीच्या तहसीलदाराची वाळू माफीयांवर धडक कार्यवाही
बिलोली प्रतिनीधी-रवी कांबळे
बिलोली तालूक्यात मांजरा नदीपात्रातून वाळू माफीयाकडून रात्र दिवस अवैध वाळू उपसा सूरू आहे.परंतु अचानकपणे बिलोली चे तहसीलदार श्रीकात निळे यांच्यासह पथकाने रात्री नदी पात्रात जाऊन धडक कार्यवाही करून वाळूचे दोन ट्रक्टर ताब्यात घेतले.वाहने जप्त केल्याने वाळू माफीयामध्ये एकच तारांबळ उडालेली दिसून येत आहे.
वाळूमाफिया रात्री बेरात्री वाळूचा उपसा करून शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बूडवत आहेत.यावेळी तहसीलदार यांनी स्वतः पूढाकार घेऊन अवैध रेती तस्कराविरोधात धडक कार्यवाही केली.
यावेळी तलाठी राजू मेहत्रे,तलाठी धनजंय माळेगावकर,तलाठी-अमीत गायकवाड,तलाठी -पवन ठकरोड,कोतवाल रामलू कानगूलवार व येसगीचे सरपंच मूखत्यार पटेल हे नदीपात्रात गेले असता दोन ट्रक्टर चालक ट्राली सोडून पसार झाले.
सदरील दोन वाहने जप्त करून बिलोली तहसील येथे लावण्यात आले.