जिल्हा परिषदताज्या बातम्यानांदेड

नायगाव तालुक्यातील धुप्पा येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत वर्धिनी आमसभा


प्रतिनिधी – नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क

नायगाव खै तालुक्यातील धुप्पा येथे दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत वर्धिनी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.तर ०६ डिसेंम्बर ते १९ डिसेंबर २०२१ दरम्यान च्या कालावधीत वर्धिनी यांनी तालुक्यातील गावात फिरून १२ स्वयंसहाय्यता समूह तयार केले व ४ जुने समूह जोडले त्यामध्ये धुप्पा येथिल १६० महिलांचा समावेश करण्यात आला तर कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन सौ शिवकर्णा गंगाधरराव पाटील,अमोल जोंधळे,दिलीप सोंडारे(समतादूत),समाजसेवक श्री कंधारे व गावातील इतर प्रतिष्ठित मान्यवर यांच्या शुभ हस्ते पूजन करून स्वागत गितासह अभियान गीत गाऊन सुरुवात करण्यात आले.
या वर्धिनी आमसभेला संबोधित करण्यासाठी विविध मान्यवरांची भाषणे झाली प्रास्ताविक श्रीमती वडडे यांनी केले,श्री माधव कंधारे यांनी मनोगत व्यक्त केले,दिलीप सोंडारे यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.

पंचायत समिती चे नायगाव तालुका अभियान व्यवस्थापक अमोल जोंधळे यांनी उपस्थित महिलांना अभियान संदर्भात माहीती देताना आसे म्हणाले की बचत समूह नुसते तयार करून चालणार नाही तर त्यांनी उद्योग व व्यवसाय उभे करावे.परावलंबी न होता स्वावलंबी बनावे.बचत समूह हे पुरुषापेक्षा महिला सक्षमतेने चालवू शकतात असे अनमोल मत नायगाव तालुका व्यवस्थापक अमोल जोंधळे यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना महिलांना मार्गदर्शन करताना अमोल जोंधळे असे म्हणाले की बचत गटाच्या महिलांनी दशसुत्री व नियमित बैठका,नियमित आर्थिक बचत,अंतर्गत कर्जव्यवहार,कर्जाची परतफेड,लेखे अद्यावत करणे,आरोग्याची काळजी,शिक्षण जागरूकता,पंचायत राज संस्था समन्वय,शासकीय योजनांचा लाभ,उपजीविका तयार करण्याबरोबरच महिलाच उत्तम प्रकारे आर्थिक बचत करू शकतात या बाबत बाजाराचे उदाहरण देऊन पटवून सांगितले.
पुढे बोलताना PMJJBY, PMSBY, APY बाबत माहिती दिली.तसेच बेरोजगार व शिक्षित मुले व मुली यांना DDUGKY व R SETI मध्ये विविध मुक्कामी व निवासी मोफत प्रशिक्षणे दिली जातात याचा लाभ घेण्याबाबत सुचविले.ICRP म्हणून सोनाबाई संभाजी गिरबनवाड या महिलेची सर्वा समक्ष निवड करण्यात आली.सदर योजनेचे काम करण्यासाठी लातूर येथील 4 वर्धिनी अनिता बाळगीर,सुलक्षणा मोरे,भाग्यश्री ससाणे,सोजर कांबळे यांनी १५ दिवस गावामध्ये मुक्कामी राहून उत्कृष्ट कामे केल्याचे दिसून आले असल्याने गावकर्यांनी समाधान व्यक्त केले.

नायगाव तालुक्यात विशेष व प्रभावी कामे होण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे मूळ रहिवासी पालक अधिकारी श्री रामदास धुमाळे राज्य अभियान व्यवस्थापक CBD बेलापूर मुंबई यांचे विशेष लक्ष,पाठपुरावा व मार्गदर्शन झुकते माप नायगाव तालुक्यासाठी नेहमी असते याबाबत अमोल जोंधळे यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष,प्रामाणिक,होतकरू,अभ्यासू व्यक्तिमत्व मा डॉ संजयजी तुबाकले अति मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक तसेच सिंघम लेडी/आयर्न लेडी श्रीमती वर्षा ठाकूर मुख्य कार्यकारी अधिकारी व श्री पी पी फांजेवाड गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे होत आहेत याबाबतही आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे गजानन पातेवार जिल्हा अभियान व्यवस्थापक,द्वारकादास राठोड,धनंजय भिसे,गणेश कवडेवार,माधव भिसे,स्वप्नील कचवे, रमेश थोरात,कुलकर्णी(लेखाधिकारी),मयूर पवार,बाबू डोळे,हणमंत कंदुरके,राजू बोरगावकर यांचे देखील मार्गदशन मिळते हे सांगण्यास विसरले नाहीत
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वाणी परिश्रम घेतले तसेच गावातील उपसरपंच मुक्ताबाई संभाजीराव कांबळे,माजी सरपंच मीना बाई बनसोडे , माजी उपसरपंच माधव खंदारे , माजी उपसरपंच पंचफुला ताई वडे, ग्रामपंचायत सदस्य महानंदाबाई पाटील, राजाबाई बनसोडे तंटामुक्त अध्यक्ष सुधाकर दरेगावे, जयसिंगराव पाटील, मारोतराव वडे, सरपंच प्रतिनिधी गंगाधरराव पाटील, उत्तमराव पाटील , शिवकांत राव कंधारे, गंगाधर राव दरेगाव , त्र्यंबक डोगळे , अनिल जांभळे, पत्रकार बालाजी पाटील सतीश पाटील पंचायत कर्मचारी दत्तात्रय बनसोडे कैलास पांचाळ इत्यादी उपस्थित होते

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »