कौठा येथे चौरेचाळीस व्या अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात
नायगाव : शेषेराव कंधारे
कौठा ता. कंधार येथे प.पूज्य सदगुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या कृपा आशिर्वादाने 44 व्या वर्षा पासुन अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन रविवारी दि.05 डिसेंबर रोजी प्रारंभ करण्यात आले असून हा सप्ताह दि.11 डिसेंबर रोजी शनिवारी टाळ आरतीचे कीर्तन विश्वनाथन स्वामी पेनुरकर यांच्या किर्तनानी सांगता होणार असुन दि.12 डिसेंबर रोजी श्री प.ब्र.१०८ सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर व श्री प.ब्र.१०८ डॉ.वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचे प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील लहान थोर सदभक्तांनी सहभागी होऊन आपले जीवन कृतार्थ करुन घ्यावे अशी विनंती समस्त शिवभक्तांच्या वतीने करण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील कौठा येथील महादेव मंदिर मैदानात अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा दि.05 डिसेंबर रोजी सुरुवात झाली असुन दि.12 रोजी रविवारी या सोहळ्याची सांगता होणार आहे. दररोज पहाटे 4 ते 6 शिवपाठ, सकाळी ८ ते 11 परमरहस्य पारायण, दुपारी २ ते ४ मन्मथगाथा भजन ५ ते ६ शिवपाठ, रात्री ९ ते ११ वाजता शिवकिर्तन दैनंदिन कार्यक्रम मोठय़ा उत्साहाने साजरा होत असुन दि.12 डिसेंबर रोजी श्री प.ब्र.१०८ सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर व श्री प.ब्र.१०८ डॉ.वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचे प्रवचन आशिर्वचन होनार आहे, दररोज संध्याकाळी ९ ते ११ शिवकिर्तन दि.05 डिसेंबर रोजी रविवारी शि.भ.प.सौ.शिवकांता पाटील मुखेडकर, सोमवारी शि.भ.प.राजेश्वर स्वामी लाळीकर, मंगळवारी शि.भ.प.चंद्रकांत आमलापुरे, बुधवारी शि.भ.प मोहनराव कावडे गुरुजी, गुरुवारी शि.भ.प कैलास महाराज जामकर, शुक्रवारी शि.भ.प.शिवानंद हैबतपुरे,
शनिवार टाळ आरतीचे कीर्तन शि.भ.प.विश्वनाथ स्वामी पेनुरकर व शिवानंद स्वामी अंबाजोगाई कर यांचे तर रविवारी शि.भ.प. मन्मथ अप्पा डांगे यांच्या महाप्रसादाच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.दुपारी 2 वाजता शिवैक्य तिप्पाजीआप्पा हात्ते यांच्या २५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला आहे.
विरशैव भजनी मंडळ राऊतखेडा, टेंभुर्णी, काटकळंबा, मंगनाळी, शिरसी, मंगलसांगवी येथील असून परिसरातील भाविक भक्तानी दैनंदिन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखंड शिवनाम सप्ताह समिती कौठ्याच्या वतीने केले आहे.