महिला सक्षमीकरणाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

189

 

आधुनिक भारताचे जनक,महान समाज सुधारक, जातीविरुद्ध लढणारे थोर सेनानी, सामाजिक क्रांतिकारक, महिलांच्या हक्काचे प्रणेते, कायदेतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानव शास्त्रज्ञ, सामाजिक शास्त्रज्ञ, तत्ववेत्ता, कामगारांना तारणारे शिल्पकार, एक सर्जनशील लेखक, एक सखोल विद्वान, झुंजार पत्रकार,शिक्षण तज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रजासत्ताक भारताचे संस्थापक, बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करणारे महामानव, एक उत्तम मानवतावादी, ज्ञानाचे प्रतीक, व जगातील महान व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे,
खऱ्या अर्थाने स्त्रियांचे उद्धारक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
आपण पाहतो हजारो वर्षापासून भारतीय स्त्री गुलामगिरीच्या साखळीत अडकून पडलेली आपल्याला दिसून येत होती. सती म्हणून जिवंत जाळणे, बालविवाह, वैधव्य, ई. अमानुष प्रकारच्या असह्य वेदनांना सोबत घेऊन काळोखात जीवन जगत होती.या पीडित महिलांना सर्व दृष्टीने मुक्त केले ते सर्वप्रथम सावित्री बाई फुले व ज्योतिराव फुले यांनी खितपत पडलेल्या या स्त्रियांना सावित्रीबाईने अंधारातून प्रकाशात आणले तोच आदर्श घेऊन पुढे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या उद्धाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. शोषणाचा विरोध एल्गार पुकारून
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योग्य वेळी मुळावर घाव घालून स्त्रीविरोधी कृत्याची कार्य मीमांसा केली. मनुस्मृति आहे म्हणून स्त्रीदास्य आहे तेव्हा तीच मिटवली तर खऱ्या अर्थाने स्त्रिया मुक्त होतील. असा प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केला. मग या जुलमी व्यवस्थेविरुद्ध गर्जना करून २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे भरलेल्या महिला मुक्त परिषदेत मनुस्मृतीची जाहीर होळी करून मनूला ठार केले. आणि स्त्री स्वातंत्र्य व समानतेचे बीज हिंदू कोड बिला मार्फत पेरले. मनुस्मृति मधील नियम २- २१३ ते २- २१५ व ९ .२ ते ९. १४ नुसार स्त्री द्वेषाची बीजे पेरली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नष्ट केली व स्त्रियांच्या उद्धारासाठी हिंदू कोड बिलाची निर्मिती करण्यात आली.स्त्रियांना पोटगीचा, संपत्तीचा, प्रसूतीदरम्यान सुट्टी, ई. एकूणच तिला माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडले. मात्र संसदेत ते पारित होऊ दिले नाही. व संसदेतील महिला सदस्यांनी हिरवी झेंडी दाखविली. हिंदू कोड बिल पारित झाले नाही तर माझा मंत्रिमंडळात राहून काय फायदा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिलच्या. विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मार्मिक उत्तर पुढील प्रमाणे दिले. आज सुधारणेच्या युगात स्त्रियांना समान हक्क द्यायला तुम्ही विरोध का करता. हिंदू कोड बिल डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या जीवनाचे ध्येय झाले होते. पुढे नंतर केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरां च्या मसुद्यातील चार स्वतंत्र कायदे बनविले (१)हिंदू मॅरेज एक्ट १९५५
(२) हिंदू सक्सेशन अॅक्ट १९५६, (३)हिंदू मायनॉरिश अंड गार्डियन शिप अॅक्ट १९५६, (४) हिंदू
अॅडॉप्शन अंड मेन्टेनन्सअॅक्ट १९५६ आपल्या अथक परिश्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना कायद्याने हक्क दर्जा समान सन्मान देऊन कधीच न फेडता येणारे असे महान कार्य केले आहे.
आज घडीला भारतातील महिलाही सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसत आहे आणि ती पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहे इतकेच नव्हे तर अगदी देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती, पंतप्रधान सुद्धा बनलेली आपल्याला दिसून आली. हे सर्व शक्य झाले ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानाच्या माध्यमातून. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटले स्त्रियांच्या प्रगती शिवाय समाज व राष्ट्राची प्रगती अशक्य आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं. संविधानाचे निर्मिती करत असताना स्त्री शिक्षणाचा अट्टाहास त्यांनी धरला. मुंबई येथील अधिवेशनात स्त्री सभेला संबोधून म्हटले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करील तो अन्याया विरूद्ध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. स्त्री ही राष्ट्र निर्मिती करते. तिच्या कृतीतूनच राष्ट्राचा नागरिक जन्म घेतो. म्हणून १९४२ मध्ये नागपूर येथील परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातून २५ लाख स्त्रिया उपस्थित होत्या. सर्व वर्गातील, तसेच सर्व घटकातील स्त्रियांना स्त्री लढ्याचे वैचारिक बळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले.
आणि त्यांनी आपल्या सुधारणावादी चळवळीत स्त्रियांच्या प्रश्नांना अग्रस्थान दिले. स्त्रियांबाबत असलेला पारंपरिक दृष्टिकोन संपवावा आणि स्त्रियांना समान दर्जा मिळावा यासाठी त्यांनी स्पष्ट आणि परखड पणे आपली भूमिका विशद केली. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांना गुलामगिरी स्वीकारावी, अन्याय सहन करावा, हे त्यांना मान्य नव्हते. यासाठी त्यांनी विशेष करून ११ एप्रिल १९४७ रोजी संसदेत हिंदू कोड बिल मांडले. हिंदू कोड बिल म्हणजे स्त्रियांच्या हक्काचा जागर होता. त्यामुळे तिला बहुपत्नीत्वाच्या जुलमातून मुक्त होता येणार होते. दृष्ट आणि व्यसनी पतीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार, दत्तक घेण्याचा अधिकार, संपत्तीचा अधिकार, वारसा हक्क, प्रेमविवाह, स्वतःचा वारसा ठरविण्याचा हक्क, इत्यादी अधिकार या हिंदू कोड बिलातून मिळणार होते. हिंदू कोड बिल म्हणजे तिच्या आयुष्याच्या अभ्युदय होता. पण दुर्दैवाने हिंदू कोड बिलाला प्रस्थापित मनुवाद्यांनी विरोध केला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दुसऱ्याच्या हक्क आणि अधिकारासाठी आपले मंत्रिपद नाकारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगाच्या पाठीवर एक महान व्यक्तिमत्त्व होते.
व आज आपल्याला कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ यात हिंदू कोड बिलाचे प्रतिबिंब पाहण्यास मिळते. या कायद्याला हिंदू कोड बिल असं नाव जरी नसले तरी ते हिंदू कोड बिलाचे एक पुस्तक रुपी ऋणात्मक रूपांतर होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या या संविधानात्मक कार्या मुळेच स्त्रियांच्या आयुष्याला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास गमावलेली स्त्री राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे समाजात भरारी घेत आहे. गलित मात्र झालेल्या स्त्रियांना हक्क आणि अधिकार याचे अमृतजल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाजले आणि आज त्या विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. जिला समाज, धर्म, अर्थ, राजकारणात, कसलेही स्थान आणि दर्जा नव्हता. अशा स्त्रियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात्मक दर्जा प्राप्त करून समान हक्क मिळवून देऊन समान दर्जा व संधी प्राप्त करून दिली. व स्त्रियांना कायद्याची गरज आहे हे त्यांनी जाणले म्हणूनच स्त्री कामगारासाठी त्याने सोई-सवलती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात मजूर मंत्री असताना त्यांनी गिरण्या, कारखाने, तेथे काम करणाऱ्या कामगार स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन मिळावे स्त्रियांना बाळंतपणाची रजा मिळावी. या महिलांच्या मुलांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघरे असावीत.१८ वर्ष पूर्ण झालेल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार असावा. अशा अनेक मागण्या मान्य करून घेतल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उत्कर्षाचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगून खऱ्या अर्थाने भारतीय संविधान हे महिलांचे एक सुरक्षा कवच आहे.स्त्रियांच्या एका हाती कायद्याचे व एका हाती चळवळीचे शस्त्र देऊन. निर्भीडपणे लढा देण्यास. शिकविणारा हा महिलांचा कैवारी महापुरुष होता.स्त्रियांच्या हक्कासाठी व उन्नतीसाठी लढणारा असा वीर महान योद्धा पुन्हा जन्माला येणे अशक्य आहे म्हणून अशा या भारताच्या महान कोहिनूर हिरा, आधुनिक मानव मुक्तीच्या लढ्यासाठी ज्याने आपले सर्वस्व पणाला लावून एक महान सामाजिक क्रांती केली.

                          असे भारतातील शोषित, पीडित, वंचित, घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना खऱ्या अर्थाने मानवधिकार मिळवून देणारे. भारतीय संविधानाचे निर्माते, परमपूज्य, बोधिसत्व, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली व कोटी कोटी त्रिवार वंदन.
========■=======■=======■==========
प्रा.शशिकांत हाटकर
सिडको नांदेड.
मो.क्र.९८९०१८१६१७
मेल आयडी hatkarshashikant2@mail.com

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.