कस्तुरबा मातृ सेवा केंद्राला महापौर जयश्री पावडे यांची भेट

आरोग्याच्या सर्वोत्तम सेवा देण्यासाठी नवीन यंत्रसामग्री उपलब्ध

278

 

 

 

 

नांदेड : आनंद गोडबोले

शिवाजीनगर येथील कस्तुरबा मातृ सेवा केंद्रास महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी नुकतीच भेट दिली. भेटीत त्यांनी येथील रुग्णालयाची पाहणी केली.आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला . पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून उपलब्ध झालेल्या अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेतील निधीतून आरोग्यासाठी अधिक चांगल्या सुविधा देणाऱ्या यंत्रसामुग्रीची उपलब्धता करण्यात आली आहे.

- Advertisement -

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने नांदेड शहरातील जनतेला आरोग्याच्या अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयाची पाहणी आणि आढावा महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने आज महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांनी शिवाजीनगर स्थित कस्तुरबा मातृ सेवा केंद्राला भेट दिली . या भेटीत त्यांनी रुग्णालयातील सर्व नवीन साहित्य आणि सामुग्रीची पाहणी केली . येथील आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोरोना लसीकरण मोहीम गतिमान करण्याबाबत सूचना देत साध्य परिस्थितीची त्यांनी माहिती जाणून घेतली.

                   या रुग्णालयास अधिक चांगला दर्जा प्राप्त व्हावा आणि येथे येणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून उपलब्ध झालेल्या निधीतून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेअंतर्गत यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे .यापुढे या रुग्णालयातून आधुनिक पद्धतीने कुटुंब नियोजन करण्यात येणार असून त्यासाठीची यंत्रसामुग्री येथे लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. याशिवाय व्हेंटिलेटर, सोनोग्राफी, एक्सरा आणि अन्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी दिली.

           यावेळी मनपा आरोग्य विभागाचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शोभा तोष्णीवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, डॉ. विजया राठोड, डॉ. जोशी, डॉ. सिंघल आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.