जवळा (दे) येथील विषेस ग्रामसभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

सौ कमलबाई साहेब शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करुन, प्रश्न निकाली

343

नांदेड (प्रतिनिधी) – आनंद गोडबोले

नांदेड दक्षिण मधिल तसेच लोहा तालुक्यातील जवळा (दे) या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच सौ. कमलबाई साहेब शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी गावातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करून, अनेक प्रश्न निकाली काढण्यात आले.

सविस्तर व्रत असे की, जवळा (दे) येथील ग्रामसभेला दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजुन ३० मिनिटांनी सरपंच सौ. कमलबाई साहेब शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रथमतः
मतदार यादीतील मयत, किंवा कांही कारणास्तव बाहेर गेलेले तसेच दोन ठिकाणी नावे असलेले मतदार यांची नावे वगळण्यात यावी . या विषयी आक्षेप आहेत का विचारले असता चर्चा करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यास सहमती दिली. त्यानंतर दुसरा विषयी पंधरावा वित्त आयोग सन २०२२-२०२३ चा क्रुती आराखडा चर्चा करून तयार करण्यात आला. आणि गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा. अशा वेळी विविध विषयांवर गावातील सुजाण नागरिकांनी आपले विचार मांडले.

- Advertisement -

यावेळी साहेब शिखरे, उपसरपंच नारायण बालाजी गवळी, बापुराव बाबाराव गवळी, माहादव पावडे, शंकर गच्चे, डॉ सुजाता गोडबोले, हारिदास पांचाळ, राजेश पावडे, राहुल गवळी, विठ्ठल गवळी, कैलाश गोडबोले, मिलिंद गोडबोले, ग्यानोबा गोडबोले, किशन गोडबोले, प्रदिप शिखरे, दिपक गव्हाने, सुनील शिखरे, आंगणवाडी कार्यकर्ती इंदिराबाई पांचाळ, सुलोचनाबाई गच्‍चे , बाई गवळी, बी एल ओ संतोष घटकार, ग्रामपंचायतचे सचिव तथा ग्रामसेवक संदीप आंबुलगेकर, मारोती चक्रधर, दिपक जाधव, आनंद गोडबोले यांच्या सह गावातील युवक आणि वृद्ध यांच्यासह अनेक नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.