ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव पा. भिलवंडे यांच्यावर हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार





नायगाव/ शेषेराव कंधारे


राजकारण, साहित्य, समाजकारण व सांस्कृतिक मंचावर चौफेर ठसा उमटविणारे नरसी येथील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, भगवानराव पाटील भिलवंडे (वय 74) यांचे मंगळवारी (दि.१६) दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.१७) सकाळी 12 वाजता नरसी येथे हजारो नागरिकांच्या उपस्थित शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

             नरसीसारख्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भगवानराव पाटील भिलवडे यांनी गावाच्या कल्याणासाठी उभे आयुष्य वेचले. शालेय शिक्षण संपल्यानंतर ते शेतीकडे वळले. १९८२ साली महाराष्ट्र शासनाने शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने त्यांचा गौरव केला. बिलोली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून भगवानरावांनी सलग दहा वर्षे काम पाहिले. बिलोली पंचायत समितीचे ते सदस्यही होते.साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते.तसेच दिलदार व्यक्तीमत्व म्हणुण त्यांची ओळख होती.तसेच कै.शंकरराव चव्हाण , अशोकराव चव्हाण ,भास्करराव पा.खतगावकर यांच्या सोबत जवळचे संबध होते .भगवानराव पाटील यांनी राजकारणात काम करीत असताना पदाची कधीही अपेक्षा केली नाही अशी त्यांची ओळख जिल्ह्यांत होती.


त्यांचा अंत्यविधी यात्रा बुधवारी राहत्या घरून साडेआकरा वाजता निधाली .नांदेड हवे रोड लगत असलेल्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यविधीप्रसंगी उपस्थितीत असलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, स्वच्छता दुत माधवराव पाटील शेळगावकर, यशपाल भिंगे, बालाजी बच्चेवार , कवी देविदास फुलारी , दिगांबर ग.कदम , गुणवंत पा.हगरगेकर ,सुरेशदादा गायकवाड,शाहीर दिगु तुमवाड , मारोतराव कवळे ,पी.आय.अशोक घोरबांड , प्रा.नामदेव जाधवसह आदीनी भगवानराव भिलंवडे यांच्या जीवन चारित्र्य वर आपले मनोगत व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केले .
यावेळी लातुरचे जिल्हा न्यायाधीश परमेश्वर सुभेदार , माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा ,राजेश देशमुख कुंटूरकर ,माजी.जि.प.अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर , सभापती संजय अप्पा बेळगे , जि.प.सदस्य मिनल ताई खतगावकर, माणिकराव लोहगावे , तहसीलदार गजानन शिंदे ,मोहन पा.धुप्पेकर, वसंत सावकार मेडेवार, साईनाथ सावकार मेडेवार,राजु गंदीगुडे , व्यंकटेश चौधरी , कैलास गोरठेकर,बाळासाहेब पा.खतगावकर, बालाजी मद्देवाड , टि.जी.पाटील रातोळीकर , प्रविण पाटील चिखलीकर, विजय पाटील चव्हाण, डाॅ. माधवराव उच्चेकर, डाॅ .माधवराव काहाळेकर ,श्रीहरी देशमुख नरगंलकर , निळकंठ ताकबिडकर , शाम चौडे टाकळीकर , शिवराज पाटील बामणीकर, गजानन पवार, माधवराव कंधारे, गणपतराव पाटील, दत्तात्रय पा.होटाळकर ,बालाजी कदम , प्राचार्य बी.एस.पिपंळे ,शिवाजी पा.पाचपिपंळीकर , कै भगवानराव पाटील भिलवंडे यांच्यावर शेवटपर्यंत उपचार करणारे डॉक्टर संतोष पाटील मोरे, किरण कदम, सुनिल लुगांरे ,रजित कुरे ,बालाजी कुरे ,तलाटी मुंडे , बालाजी भोसले , दिलीप पाटील, माजी प्राचार्य विजय पाटील ,प्राचार्या सौ.कल्पना पाटील ,प्राचार्य डि.पी.पांडे ,सपोनि महादेव पुरी, विजय जाधव, जगन शेळके, शिवाजी पा. पाचपिंपळीकर, दिलीप शिंदे यांच्यासह भिलवंडे परिवारातील संभाजी पा. भिलवंडे, मारोतराव भिलवंडे, गंगाधर भिलवंडे, रवींद्र भिलवंडे,
श्रावण भिलवंडे,मोहन भिलवंडे, गजानन भिलवंडे, संदीप भिलवंडे, बालाजी भिलवंडे, सरपंच गजानन भिलवंडे व जिल्ह्यातील राजकीय ,साहित्यिक ,सामाजिक शिक्षक, प्राचार्य , सरपंच ,उपसरपंच , सदस्य चेअरमन ,पोलीस पाटील, पत्रकार, जेष्ठ नागरिक, नातेवाईक, मित्र परिवार ,महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती अखेरचा निरोप देण्यात आला.भगवानराव भिलंवडे यांचे निधन होताच नरसीतील व शकरनगर येथील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .

Comments (0)
Add Comment