नायगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याचे महिन्या पासुन पैसे खात्यावर पडेनात : शंभरच्या वर लाभार्थी हैराण..



नायगाव – लक्ष्मण बर्गे

देशात एक ही गरीब कुटुंब घरा पासुन वंचित राहु नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्या पासुन प्रधानमंत्री आवास घरकुल योजना सुरू केले .मागील दिड महीण्यापासुन घरकुल धारक घर बाधुनही खात्यावर रक्कम जमा होत नसल्याने घरकुल धारक हतबल झाले आहेत.

           देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू केले मागील काळात नायगाव तालुक्यात जवळपास ५२४८ घरकुल मंजूर केले होते .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबासाठी सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी योजनेचा देशासह नायगाव तालुक्यातील ब-यांच कुटूंबाला फायदा होऊन अनेकांचे घर बांधण्यायांचे स्वप्न पूर्ण झाले .मंजुर झालेल्या ५२४८ घरकुल धारका पैकी ३४४५ लाभधारकानी घर बाधकांम पुर्ण केले असुन उर्वरित राहीलेल्या १८०३ लाभार्थ्याच्या खात्यावर पहीला हप्त्याची रक्कम जमा झाल्याने हे लाभार्थ्या पुढील काळात घरकुल बांधकाम पुर्ण करतील .

मागील काळाततील लाभार्थ्याचे घरकुल बांधकाम पुर्ण झाले त्यातील शंभर लाभार्थ्याच्यावर लाभार्थ्याचे तीसरे व शौचालय बांधकाम पुर्ण झालेल्या असे चौथे बिल पंचायत समिती कडू ऑनलाईन ही करण्यात आले पण गेल्या दिड महीण्यापासुन एफ.टी.ओ.ची अडचण येत असल्याने रक्कम जमा होत नसल्याचे घरकुल विभागाचे कर्मचारी पांचाळ यांनी सांगितले.

घरकुल बांधुनही रक्कम खात्यावर जमा होत नसल्याने अनेक लाभार्थ्या अडचणीत सापडले आहेत .व ये लाभार्थी पंचायत समिती ला खेटे मारत आहेत तरी वरिष्ठ अधिका-यांनी या कडे लक्ष देऊन घरकुचे रखडलेले रक्कम मिळून द्यावे अशी मागणी घरकुल धारकातुन होत आहे

Comments (0)
Add Comment