जेष्ठ साहित्यिक भगवानराव पा.भिलंवडे यांचे निधन.

बुधवारी नरसी येथे अंत्यसंस्कार.




 

नायगाव – शेषेराव कंधारे 

नरसी ता. नायगाव येथील रहिवासी तथा जेष्ठ साहित्यिक भगवानराव भिमराव पा. भिलंवडे यांचे दि.१६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता च्या दरम्यान दुःखद निधन झाले ते ७० वर्षांच होते.त्यांच्या पार्थिवावर दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नरसी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .

         नरसी येथील भगवानराव भिमराव पा. भिलंवडे हे कै.शंकरराव चव्हाण ,भास्करराव पा.खतगावकर ,अशोकराव चव्हाण यांच्या सोबत राजकारणात काम केले. भागवानराव पाटील भिलवडे हे गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याचे व्हहिस चेअरमन म्हणून अनेक वर्षं निस्वार्थ काम केले तसेच महाराष्ट्र राज्याचे संस्कृतीक मंडाचे सदस्य म्हणून साहीत्यीक क्षेत्रातही काम करत अनेक चांगले निर्णय घेतले, शंकरनगर येथील गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव म्हणून काम केले, पंचायत समितीचे सदस्य,नरसी येथील तुळजाभवानी जिनिंचे अध्यक्ष व दत्तात्रय संस्थेचे अध्यक्ष म्हणून पदे भुषविले, भगवानराव पा भिलवंडे हे एक दिलदार व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्ती म्हणून ते परिचित होते .

भगवानराव पा भिलंवडे हे अल्पशा आजाराने दि१६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता निधन झाले त्यांच्या पश्रात तीन मुले एक मुलगी ,पत्नी , सुना नातवंडे अशा परिवार असुन त्यांच्या पार्थिवावर आज दि.१७ रोजी सकाळी आकरा वाजता नरसी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . भगवानराव पा भिलवंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे यांचे वडील होत.

Comments (0)
Add Comment