नायगाव महावितरण उप कार्यकारी अभियंता कौरवार पाठोपाठ स.अभियंता सुरेश गंधे ही निलंबित.

देगाव येथील नागरिकांची दिवाळी अंधारात,पंधरा दिवसांपासून लाईट चा बेपत्ता अधिकारी नॉट रीचेबल.




 

 

 

नायगाव – रामकृष्ण मोरे

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उप कार्यकारी अभियंता उप विभाग नायगाव सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला असून काही दिवसापूर्वीच निलंबित झालेले उप कार्यकारी अभियंता कौरवार यांच्या नंतर स. अभियंता सुरेश गंधे ही निलंबित झाल्याने महावितरण विभागावर प्रश्न चिन्हं निर्माण झाले आहेत. सदरील वृत असे की तक्रारीचा कळस गाठलेले नायगाव महावितरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता पाठोपाठ स. अभियंता गंधे यांनाही निलंबित करण्याची नामुष्की महावितरण विभागावर ओढावली आहे. सुरेश प्रेम गंधे हे सहाय्यक अभियंता या पदावर नायगाव शहर शाखा कार्यालय येथे कार्यरत असून त्यांच्याकडून गंभीर स्वरुपाची गैरवर्तणुकीच कृत्य व कामामध्ये अनियमितता घडलेली आहे. ते नियंत्रण अधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडून (ता.७) आक्टोबर २०२१ पासून कामावरून गैरहजर होते. त्यामुळे सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत असून महावितरणची सेवा हि ग्राहकाभिमुख असून ग्राहकांना उचित सेवा वेळेमध्ये देणे हे आपले आद्य कर्तव्य असतांना देखील आपण आपणास नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्यावर गैरहजर असल्याची गंभीर बाब निदर्शनास आलेली आहे असे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी नायगाव शहर शाखा कार्यालयाची विज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्व करणे करिता पत्र क्र.अअ/नांदेड/मासं/गोप/१४६३/२०२१/९४३३७/१८०७ दि.१७.०९.२०२१ अन्वये एकूण रु.२८.९६ लक्ष इतकी विज बिल थकबाकी असले बाबत कळवून विज बिल वसुलीचे उद्दिष्ठ पूर्ण करणे करिता आवश्यक ते विशेष प्रयत्न करून करणे बाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे तरी अद्यापपर्यंत विज बिल वसुलीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून विज बिल वसुलीचा दैनदिन आढावा घेणे करिता आपले भ्रमणध्वनी क्रमांकवर संपर्क केला असता आपला कंपनीचा क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढलेल्या असून जन माणसात कंपनीची प्रतिमा मलीन झालेली आहे व त्यास आपण सर्वस्वी जबाबदार आहात असाही ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून देगाव येथील ग्रामपंचायत परिसराची सिंगल फेस डी.पी. बंद असून पूर्ण केबल जळून खाक झाले आहेत. लाईनमन भालेराव यांच्याशी संपर्क केला असता सदरील डी.पी.जळल्याचा रिपोर्ट वरती कळविले असल्याचे सांगण्यात आले, परंतु अतिरिक्त चार्ज असलेले नर्शी येथील अभियंता खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजून रिपोर्ट आला नसल्याचे सांगून उडवा उडवीची उत्तरे दिली.

या सर्व प्रकारात सामान्य जनता भरडत आहे याची दखल संबंधित विभाग घेईल का असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

एकाच महिण्यात महावितरण कंपणीतील उप कार्यकारी अभियंता व सहायक अभियंत्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने खळबळ तर उडालीच आहे पण महावितरणमधील सावळागोंधळ उघड झाला आहे.

Comments (0)
Add Comment